St Employee News : एसटी महामंडळात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर एसटी महामंडळ अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यंदाचा दिवाळीचा सण गोड व्हावा यासाठी एसटी महामंडळाने ऑक्टोबर महिन्याचा त्यांचा पगार हा दिवाळीच्या आधीच जमा व्हावा यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
महामंडळाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळीच्या आधीच व्हावा यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. याशिवाय एसटी महामंडळ अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळावा यासाठी निधीची मागणी देखील करण्यात आली आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा पगार हा महिन्याच्या सात तारखेला होतो. अर्थातच ऑक्टोबर महिन्याचा पगार हा 7 नोव्हेंबरला होणे अपेक्षित आहे. मात्र जर 7 नोव्हेंबरला एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झाला तर त्यांना दिवाळी उसनवारीच्या पैशाने साजरी करावी लागणार आहे.
कारण की दिवाळी सण हा 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. त्यामुळे महामंडळातील कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पगार मिळाला तर त्यांची दिवाळी आनंदाने साजरा होईल अन्यथा त्यांना उसनवारीने पैसे घ्यावे लागणार आहेत.
हेच कारण आहे की एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या खात्यात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पगार जमा करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.
शिवाय, दरवर्षी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांना 5000 रुपयांचा बोनस दिला जात असतो यंदाही या कर्मचाऱ्यांना हा बोनस मिळावा यासाठी अतिरिक्त निधीची मागणी एसटी महामंडळाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
यामुळे सरकार महामंडळाच्या या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे. आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सणाच्या आधीच कर्मचाऱ्यांना पगार मिळणार की उसनवारीनेच पैसे घेऊन दिवाळी साजरी करावी लागणार हे पाहणे देखील विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.