ST Employees : एसटी महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळातील हजारो कर्मचाऱ्यांना पाच सहा आणि सात जुलै रोजी मोफत भोजन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय.
खरे तर दरवर्षी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी असते. आषाढी एकादशीला महाराष्ट्रातील तसेच राज्य बाहेरील अनेक भाविक भक्त विठुरायांच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात.

दरम्यान या भाविकांच्या सोयीसाठी सरकारकडूनही काही उपाययोजना केल्या जातात. एसटी महामंडळाकडून भाविकांसाठी विशेष गाड्या चालवल्या जातात तसेच रेल्वे कडूनही विशेष रेल्वे सुरू केल्या जातात.
दरम्यान यावर्षी सहा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आणि यामुळे श्रीक्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाकडून यंदाही अतिरिक्त बसेस चालवल्या जात आहेत.
यावर्षी एस टी महामंडळाकडून 5200 बसेसद्वारे भाविकांची वाहतूक केली जाणार आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था केली आहे.
कुठे असणार मोफत भोजनाची व्यवस्था?
एसटी महामंडळाने आषाढी एकादशी निमित्ताने सेवेत रुजू असणाऱ्या चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकारी अशा सर्व कर्मचाऱ्यांना 5, 6 आणि 7 जुलै रोजी मोफत भोजनाची व्यवस्था करून दिली आहे.
ही मोफत भोजनाची व्यवस्था एसटी कर्मचाऱ्यांना चंद्रभागा, भिमा, विठ्ठल आणि पांडुरंग बस स्थानकांवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. या मोफत भोजनाचा जवळपास 13000 कर्मचाऱ्यांना लाभ दिला जाणार असल्याचेही महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयाची माहिती स्वतः राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या निर्णयाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे ही व्यवस्था स्वखर्चाने केली जाणार असल्याचे सरनाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. एकादशीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना उपवासाचे पदार्थ दिले जाणार आहेत.
एवढेच नाही तर ही योजना दरवर्षी राबवली जाईल असा संकल्प देखील यावेळी प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. त्यामुळे नक्कीच राज्यातील हजारो एसटी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.