एसटी महामंडळात 17,450 रिक्त पदाची भरती, पगार मिळणार 30 हजार रुपये महिना, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती

Published on -

ST Mahamandal Recruitment : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जर तुम्हीही सरकारी नोकरीसाठी तयारी करत असाल तर तुम्हाला एसटी महामंडळात एक सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. एसटी महामंडळात लवकरच 17 हजाराहून अधिक रिक्त पदांसाठी भरती निघणार आहे.

यामुळे जर तुमचही एसटी महामंडळात काम करण्याचे स्वप्न असेल तर तुम्ही आता आपल्या तयारीला आणखी वेग द्यायला हवा. कारण आता कोणत्याही क्षणी सरकारकडून एसटी महामंडळातील पदभरतीची अधिकृत अधिसूचना जारी होऊ शकते.

स्वतः राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे. एसटी महामंडळ लवकरच हजारो रिक्त पदांसाठी पदभरती जाहीर करणार असून या अंतर्गत नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना सुरुवातीपासूनच तीस हजार रुपये महिना पगार दिला जाणार आहे.

मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार महामंडळात कंत्राटी चालक आणि सहाय्यकाची भरती निघणार आहे. या पदभरती अंतर्गत 17 हजार 450 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून ह्या भरतीची वाट पाहिली जात होती.

महामंडळात पद भरती कधी निघणार हा सवाल अनेक उमेदवारांकडून उपस्थित केला जात होता. अखेर कार आता या प्रश्नांना पूर्णविराम लागणार आहे. सरकार लवकरच या पदभरतीची अधिसूचना जारी करणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे ही पदभरती प्रक्रिया राबवण्यासाठी शासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. पुढल्या महिन्यात यासाठीची निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. महात्मा गांधी जयंती दिनी अर्थात 2 ऑक्टोबर रोजी या पदभरतीची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे.

या पदभरती अंतर्गत 17,450 रिक्त जागा भरल्या जाणार असल्याने एसटी महामंडळात नोकरीसाठी धडपड करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी राहणार आहे. या पदभरती मधून नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना कमीत कमी 30 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

नक्कीच ही नवयुवक तरुण-तरुणींसाठी मोठी सुवर्णसंधी राहणार आहे. यामुळे एसटी महामंडळात नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी आतापासूनच कागदपत्रांची तयारी करून ठेवावी. एसटी महामंडळाकडून लवकरच हजारो पदांसाठी भरती जाहीर करण्यात येईल.

पण या रिक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता कशी असेल, वयोमर्यादा काय राहणार, भरतीची प्रक्रिया कशी असणार ? याबाबत अद्याप कोणतीही माहिती हाती आलेली नाही. एसटी महामंडळाकडून लवकरच यासंदर्भात माहिती दिली जाणार आहे.

या पदभरतीची जाहिरात येत्या काही दिवसांनी जारी केली जाईल आणि जाहिरातीमध्ये पदासाठी आवश्यक शिक्षण तसेच इतर अटींची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News