ST Workers News : एसटी महामंडळातील हजारो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. एसटी महामंडळाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा एसटी कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून करण्याचा एसटी महामंडळातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महामंडळाकडून सध्या निवृत्त कर्मचाऱ्यांना साध्या बसमधून प्रवास करण्यासाठी पास उपलब्ध करून दिला जात आहे.
या पासचा वापर करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास करता येतो. मात्र सध्या हा पास फक्त साध्या बस मध्ये प्रवास करण्यासाठी चालतोय.
पण, नवीन निर्णयानुसार आता एसटी महामंडळातून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्लीपर कोच बस मध्ये देखील या पासचा वापर करून प्रवास करता येणार आहे. यासाठी मात्र भाड्याच्या फरकाची रक्कम सदर निवृत्त कर्मचाऱ्यांना भरावी लागणार आहे.
मयत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांनाही मिळणार फायदा
याशिवाय, एसटी महामंडळाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या मयत कर्मचाऱ्यांच्या पत्नी वा पती यांनाही आता 65 वर्षाऐवजी 75 वर्षांपर्यंत पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या पत्नी व पतीला वयाच्या 65 वर्षांपर्यंत पास मिळतं असे. आता मात्र त्यांनाही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांप्रमाणेच वयाच्या 75 वर्षांपर्यंत पास मिळणार असल्याने सदर पात्र व्यक्तींना मोठा दिलासा मिळणार आहे.
म्हणजे आता एसटी महामंडळातून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसह मयत झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पतीला किंवा पत्नीला त्यांच्या वयाच्या 75 वर्षांपर्यंत मोफत प्रवासासाठी पास उपलब्ध करून दिला जाणार आहे.
किती महिने मिळणार मोफत प्रवासाचा लाभ
महामंडळातून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच मयत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पतीला किंवा पत्नीला प्रत्येक वर्षी जुलै ते फेब्रुवारी या ऑफ सीजनमध्ये या पासचा वापर करून मोफत प्रवास करता येणार आहे.
या पासचा वापर करून आठ महिने कालावधीसाठी साध्या बसने मोफत प्रवास आणि फरकाची रक्कम भरून शिवशाही स्लीपर, शिवनेरीसह इतर सगळ्या लक्झरी बसमध्ये प्रवास करता येणार आहे.