Small Business Idea : सुरू करा ‘हा’ व्यवसाय, महिन्याकाठी होणार लाखोंची कमाई ! नोकरीपेक्षा अधिक कमाई होणार

Ahmednagarlive24 office
Published:
Small Business Idea

Small Business Idea : अलीकडे नोकरीपेक्षा व्यवसायाला अधिक प्राधान्य मिळत आहे. अनेकजण आता नोकरीमधून अपेक्षित अशी कमाई होत नसल्याने अतिरिक्त उत्पन्नासाठी वेगवेगळे पर्याय शोधत आहेत.

नोकरी सोबतच काही लोक अतिरिक्त काम करून अधिकचा पैसा जमा करत आहेत. तर काही लोक नोकरी सोबतच व्यवसाय सुरू करत आहेत. नोकरीमध्ये असणारी असुरक्षितता पाहता आता अनेक तरुणांनी नोकरी ऐवजी व्यवसायात हात आजमावला आहे.

मात्र काही लोकांना व्यवसाय करायचा असतो पण कोणता व्यवसाय करावा हे सुचत नाही. तुम्हालाही व्यवसाय सुरू करायचे असेल पण कोणता व्यवसाय सुरू करावा जेणेकरून चांगली कमाई होईल हे सुचत नसेल तर

तुमच्यासाठी आज आम्ही एक बिजनेस प्लॅन घेऊन आलो आहोत. आज आपण कॉटन बड्स किंवा कॉटन स्वॅब बनवण्याचा व्यवसायाबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कॉटन बड्स मेकिंग व्यवसाय कसा सुरू करायचा

कॉटन बड्स कान साफ करण्यासाठी वापरले जातात. याशिवाय या प्रॉडक्टची डिमांड प्रयोगशाळांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. प्रयोगशाळांमध्ये स्वॅब घेण्यासाठी याचा वापर होतो. याशिवाय इतरही अनेक ठिकाणी या प्रॉडक्टची मोठी डिमांड आहे. यामुळे कायमच मागणी मध्ये असलेल्या या प्रॉडक्टची मॅन्युफॅक्चरिंग केल्यास तुम्हाला चांगला नफा मिळू शकणार आहे. विशेष म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला खूपच कमी भांडवल लागणार आहे. कॉटन बड्स तुम्ही मशीनच्या माध्यमातून तयार करू शकता. सुरुवातीला छोटी मशीन खरेदी करून या व्यवसायाची सुरुवात केली जाऊ शकते.

कसे तयार होतात कॉटन बड्स

कॉटन बड्स तयार करण्यासाठी वापरली जाणारी छोटी काठी म्हणजे स्पिंडल सामान्यतः लाकडापासून बनविली जाते. हे इको फ्रेंडली असल्याने लाकडाच्या स्पिंडलचे कॉटन बड्स बाजारात अधिक मागणीत असतात.

दरम्यान कॉटन बड्स तयार करण्यासाठी तुम्हाला बाजारातून 5 सेमी ते 7 सेमी लांबी असलेली स्पिन्डल आणावी लागेल. हे तुम्हाला अगदी नाममात्र किमतीत बाजारात मिळणार आहे. यानंतर कॉटन म्हणजेच कापूस लागेल. जे तुम्ही स्पिंडलच्या दोन्ही टोकांना लावाल.

यासाठी लागणारा कापूस तुम्ही शेतकऱ्यांकडून खरेदी करू शकतात किंवा कमी दरात बाजारात सुद्धा कापूस उपलब्ध होतो. याशिवाय कापूस चिपकवण्यासाठी तुम्हाला एका विशिष्ट पदार्थाचा वापर करावा लागणार आहे.

जेणेकरून स्पिंडलला लावण्यात आलेला कापूस निघणार नाही. जेव्हा कॉटन बड्स पूर्णपणे तयार होतात तेव्हा त्यावर सेलेलोज पॉलिमर केमिकल लावले जाते. असे केल्याने कापूस खराब होत नाही. दरम्यान हे केमिकल लावल्यानंतर कॉटन बड्स पॅक करून याची विक्री करावी लागणार आहे.

मालाची विक्री कुठे करणार

कॉटन बड्स बनवल्यानंतर तुम्ही मेडिकल स्टोअर्स, हॉस्पिटल्स, टेस्टिंग लॅब्स, कॉस्मेटिक प्रॉडक्ट्सची दुकानं, ब्युटी पार्लर सेंटर्स, इलेक्ट्रॉनिक रिपेअरिंग मार्केट्स, पेंटिंग प्रॉडक्ट मार्केट्समध्ये विकू शकता. जर तुमचा सेल चांगला झाला तर तुम्हाला निश्चितच या व्यवसायातून चांगली कमाई होणार आहे.

दरम्यान तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील बाजारपेठांमध्ये तुमच्या प्रोडक्टची जाहिरात करावी लागणार आहे. यासाठी तुम्ही पॅम्प्लेट छापू शकता किंवा सोशल मीडियावर देखील तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe