बिजनेस सुरु करताय ? मग ‘हा’ Business सुरु करा महिन्याकाठी होणार लाखोंची कमाई, लग्नसराईत तर पैशांचा पाऊसच पडणार, पहा…

Ahmednagarlive24 office
Published:
Small Business Idea

Small Business Idea : अलीकडे नोकरी ऐवजी व्यवसायाला विशेष प्राधान्य दिले जात आहे. छोटा का असेना पण स्वतःचा व्यवसाय असावा अशी धारणा आता वेगाने विकसित होत आहे.

नोकरी मधून एक निश्चित इन्कम होत असते. मात्र व्यवसायातून अनलिमिटेड इनकम केली जाऊ शकते. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये भारतात विविध स्टार्टअप सुरू झाले आहेत.

अशा परिस्थितीत जर तुम्हीही नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी विशेष कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण एका भन्नाट बिजनेस आयडिया बाबत जाणून घेणार आहोत.

आज आपण कार्ड प्रिंटिंग व्यवसायाविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. कार्ड प्रिंटिंग व्यवसायाला संपूर्ण बारा महिने मागणी असते. यामुळे या बिझनेसमधून चांगली कमाई होण्याची शक्यता असते.

खरेतर लोक विजिटिंग कार्ड, लग्नपत्रिका, छोट्या-मोठ्या समारंभाची पत्रिका, वाढदिवसाची पत्रिका, व्यवसायाचे पॅम्प्लेट इत्यादी प्रिंट करत असतात. दरम्यान हे सारे प्रिंटिंगचे काम कार्ड प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू करून केले जाऊ शकते.

कसा सुरू करणार व्यवसाय

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काही मशीन्स लागणार आहेत. कार्ड प्रिंटिंग साठी प्रिंटर मशीन लागणार आहे. याशिवाय तुम्हाला लॅपटॉप किंवा कम्प्युटर आणि इतर अन्य महत्वाचे उपकरण लागणार आहेत. या व्यवसायासाठी तुम्हाला तुम्ही जिथे वास्तव्याला आहेत त्या शहरातील पॉश ठिकाणी किंवा बाजारपेठेच्या ठिकाणी दुकान टाकावे लागणार आहे.

एकंदरीत हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला एक ते दोन लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागू शकते. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय आणखी मोठा करायचा असेल तर गुंतवणूक वाढणार आहे.

तुमच्याकडे स्किल असणे आवश्यक

खरे तर कार्ड कोणीही प्रिंट करत मात्र तुमच्याकडे डिझायनिंगचे स्किल असणे आवश्यक आहे. जर तुम्ही चांगल्या तऱ्हेने कार्ड डिझाईन केले आणि ते तुमच्या ग्राहकाला दिले तर निश्चितच ग्राहक तुमच्या कामावर खुश होईल आणि अशा तऱ्हेने तुम्ही एक मोठी ग्राहक चैन तयार करू शकता.

हा व्यवसाय बारा महिने चालतो मात्र लग्नसराई आल्यास या व्यवसायाला पंख फुटतात. कारण की, उन्हाळ्यात लग्न समारंभ असतात आणि लग्नपत्रिका छपाईतुन चांगली कमाई तुम्हाला होऊ शकणार आहे.

किती कमाई होणार

या व्यवसायातून किती कमाई होणार हे तुमच्या सेलिंग वर अवलंबून असेल. एका कार्ड मागे तुम्हाला तीन ते पाच रुपयांपर्यंतचा नफा राहू शकतो. अशा तऱ्हेने जर तुम्ही दिवसाला 1000 कार्ड प्रिंट केलेत आणि ते ग्राहकांपर्यंत पोहोचवले

तर तुम्हाला जवळपास तीन हजार रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंतची कमाई यातून करता येणार आहे. दिवसाला एव्हरेज तीन हजाराची जरी कमाई पकडली तरी तुम्ही महिन्याकाठी या व्यवसायातून 90 हजार पर्यंतचे उत्पन्न मिळवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe