मोठी बातमी ! महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 3 मोठे शासन निर्णय (GR) जारी ! वाचा…

महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कर्मचारी सध्या जानेवारी महिन्यापासूनच्या महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, पुढील महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळू शकतो अशी माहिती हाती आली आहे. तत्पूर्वी राज्य शासकीय सेवेतील काही कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दोन महत्त्वाचे शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आले आहेत. 

Published on -

State Employee News : कालचा दिवस महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा खास ठरला आहे. कारण की, काल 19 मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून 2 मोठे शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत.

दरम्यान आज आपण याच दोन्ही शासन निर्णयाची माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामुळे जर तुम्हीही शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी सरकारी कर्मचारी म्हणून सेवा देत असेल तर आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायला हवी.

ही बातमी ग्रामविकास विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या आणि कृषी विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे कारण की हे शासन निर्णय याच विभागाच्या संदर्भातील आहेत. 

राज्य सरकारकडून निर्गमित करण्यात आलेले 2 महत्त्वाचे जीआर

या कर्मचाऱ्यांना मिळणार पदोन्नती : महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागमार्फत 19 मे 2025 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला. या निर्गमित शासन निर्णयानुसार,

राज्य विकास सेवा मधील गट ब संवर्गात येणाऱ्या सहायक गट विकास अधिकारी ( एस – 15 ) या अधिकाऱ्यास गट अ संवर्गातील गट विकास अधिकारी म्हणजेच BDO ( एस – 20 ) मध्ये तदर्थ पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

https://drive.google.com/file/d/1_0tuh0bu8lX3UwU2YAsntGNUPA7vslKI/view?usp=drivesdk या लिंक वर जाऊन राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाचा कालचा शासन निर्णय पाहता येणार आहे.

या कर्मचाऱ्यांची बदली / पदस्थापना करणेबाबत महत्त्वाचा शासन निर्णय : महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभाग मार्फत दुसरा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

या 19 मे 2025 रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार, कृषी सेवा गट अ, उपसंचालक व गट ब तालुका कृषी अधिकारी / तंत्र अधिकारी संवर्ग त्याचबरोबर प्रशासकीय सेवा गट अ व ब संवर्ग मधील अधिकाऱ्यांच्या बदली / पदस्थापना करण्याकरीता समितीची पुनर्रचना करण्यास विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या कृषी व पद्म विभागाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय (GR) https://drive.google.com/file/d/1QBDuXaVLgi2pKAoRlT7L61Q-xPq2J1th/view?usp=drivesdk या लिंक वर जाऊन पाहता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe