महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार 25,000 रुपयांचा दिवाळी बोनस ! कोणाला मिळणार लाभ?

Published on -

State Employee News : सध्या संपूर्ण देशभर नवरात्र उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे अगदीच आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान, याच आनंदमयी वातावरणात राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. महाराष्ट्र राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांना 25 हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे.

आपल्याला ठाऊकच आहे की नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला होता. रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून वितरित करण्यात येणार आहे.

दुर्गा पुजा व विजयादशमीच्या आधी हा बोनस त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतल्यानंतर इतरही कर्मचाऱ्यांना आता हळूहळू बोनस जाहीर केला जातोय.

येत्या काही दिवसांनी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा बोनस मिळणार आहे. दुसरीकडे आज राज्यातील महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सुद्धा बोनस जाहीर केला आहे.

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन हजार रुपयांचा बोनस दिला जाणार आहे. आता म्हाडाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आहे.

Mhada च्या कर्मचाऱ्यांना यंदा डायरेक्ट 25 हजार रुपये बोनस मिळणार आहे. 2024 मध्ये ह्या लोकांना 23 हजार मिळाले होते. पण यावर्षी यात दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

यंदा म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना 25000 रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्राधिकरणाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.

Mhada प्राधिकरणाची नुकतीच एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली होती. या महत्वपूर्ण बैठकीत कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून बोनस बाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला.

चर्चेनंतर हा प्रस्ताव अधिकाऱ्यांकडून स्वीकृत करण्यात आला. यानुसार आता म्हाडा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना 25 हजार रुपये एवढा बोनस मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe