State Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता संदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे. एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट ने त्यांच्या सूत्रांच्या हवाल्यानुसार होळीच्या सणापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जात असतो.
जानेवारी महिन्यापासून आणि नंतर जून महिन्यापासून महागाई भत्ता वाढ कर्मचाऱ्यांनाही मिळत असते. सद्यस्थितीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के महागाई भत्ता मिळत आहे आणि आता यामध्ये आणखी 4 टक्के इतकी वाढ होणार आहे. म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून 42 टक्के दराने महागाई भत्ता म्हणजे डीए मिळणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की एक मार्च रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आयोजित झाली आहे. यां बैठकीत महागाई भत्ता संदर्भात हा निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. निश्चितचं मार्च महिन्यात हा निर्णय होणार असला तरी केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून अनुज्ञय असेल.
म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यातील महागाई भत्ता वाढ थकबाकीची रक्कम ज्याला डीए ऍरियर्स म्हणतात ती देखील देऊ केली जाणार आहे. निश्चितच यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आता आपण महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतनात किती वाढ होईल याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
इतका वाढणार पगार
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये चार टक्के वाढ झाल्यास 18000 मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात 720 रुपयांची मासिक वाढ होणार आहे. म्हणजे वार्षिक 8640 रुपयांची वेतनात वाढ होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या स्थितीला म्हणजेच 38 टक्के दराने 18000 मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्याला सहा हजार 840 रुपये इतका महागाई भत्ता मिळत असून 42% DA झाल्यास या कर्मचाऱ्यांना 7560 रुपये महागाई भत्ता मिळेल.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पण मिळणार लाभ
जस की आपणास ठाऊकच आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना DA वाढ लागू झाल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील लागू केली जाते. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील जानेवारी महिन्यापासून डीए वाढ मिळेल.