State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर, ही बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भातील आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.

एक नोव्हेंबर 2005 पासून राज्य शासकीय सेवेतील कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजने ऐवजी नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली असून ही नवीन योजना लागू झाल्यापासूनच सरकारी कर्मचाऱ्यांनी नवी योजना रद्द करून पुन्हा एकदा पूर्वलक्षी प्रभावाने जुनी योजना अमलात आणावी अशी आग्रही मागणी लावून धरली आहे.
यासाठी सातत्याने सरकार दरबारी पाठपुरावा सुद्धा केला जात आहे. जुनी पेन्शन योजनेच्या मागणीवरून राज्यातील जवळपास 17 लाख राज्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण देखील सुरू केले होते.
मात्र सरकारकडून जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष प्रभावाने जशाच्या तशी अजूनही लागू करण्यात आलेली नाही. दुसरीकडे केंद्राने नवीन पेन्शन योजने ऐवजी युनिफाईड पेन्शन स्कीम आणली आहे आणि हीच युनिफाईड पेन्शन स्कीम राज्यातील कर्मचाऱ्यांना देखील लागू होणार आहे.
अशी सारी परिस्थिती असतानाच आता महाराष्ट्र राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्र राज्यातील काही कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार आहे.
या सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार जुनी पेन्शन योजना
मिळालेल्या माहितीनुसार एक नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात निघालेल्या परंतु सदर जाहिरातीनुसार एक नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या राज्यातील काही विभागातील कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना लागू होणार आहे.
महसूल व वन विभागातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होईल अशी माहिती समोर आली आहे. महसूल व वन विभागातील लघुलेखक ( इंग्रजी ) या पदावरील श्रीमती अपेक्षा राणे यांना जूनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.
सदर कर्मचाऱ्यास जुनी पेन्शन योजना लागू करतांनाच NPS मधील कर्मचारी योगदान GPF खाते उघडून त्यामध्ये वर्ग करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले आहेत.