अक्षय तृतीयाच्या आधीच कर्मचाऱ्यांची चिंता वाढली; महाराष्ट्रातील ‘या’ लाखो राज्य कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार

महाराष्ट्रातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारा संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Published on -

State Employee News : सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आठवा वेतन आयोगाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. आठवा वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. जानेवारी २०२६ पासून प्रत्यक्षात आठवा वेतन आयोगाची अंमलबजावणी शक्य आहे.

मात्र असे असतानाच राज्यातील काही कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा वेतनाचे संकट उभ राहील आहे. खरंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न आत्ताच उभा राहिलाय असं नाही तर वारंवार व्यक्ति कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न हा समोर येत असतो.

एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन मिळत नाही ही एक मोठी गंभीर बाब आहे. दरम्यान यावेळी म्हणजेच मार्च महिन्याचा पगारासाठी सरकारकडून महामंडळाला केवळ ४० कोटी रुपयांचा निधी दिला गेल्यामुळे कर्मचारी वर्गात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या हजारो कर्मचाऱ्यांचा पगार अद्यापही रखडलेला असून, दिलेला निधी अत्यल्प असल्याने पूर्ण वेतन देणे शक्य होणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. “सरकारने फक्त ४० कोटी रुपयांचा निधी एसटी बँकेकडे वर्ग केला आहे, पण वेतनासाठी किमान २५० ते ३०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

त्यामुळे हे पैसे पुरेसे नाहीत,” असे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले. दरम्यान, राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांमध्ये यामुळे तीव्र नाराजी असून, अनेक जिल्ह्यांत आंदोलक पवित्रा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कर्मचाऱ्यांनी तातडीने संपूर्ण वेतनासाठी योग्य निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. सरकारकडून या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहिले जात आहे का, हा प्रश्न कर्मचाऱ्यांच्या मनात आहे.

सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ३०० कोटी रुपयांची आवश्यकता असताना देखील ४० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले असल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या मनात मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरोधात नाराजी पाहायला मिळत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी महामंडळाला तब्बल २६० कोटी रुपये कमी मिळाले आहेत. यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका कसा होणार हा मोठा प्रश्न आहे.

हेच कारण आहे की आता आगामी काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतना संदर्भात सरकारकडून काय भूमिका घेतली जाते? महामंडळ याबाबत काय पाठपुरावा करते या सर्व गोष्टी पाहण्यासारख्या राहणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News