फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार प्रोत्साहन भत्ता आणि वाढीव ग्रॅच्युइटीचा लाभ

राज्यातील काही कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता आणि ग्रॅच्युइटीचा लाभ मिळणार आहे. फडणवीस सरकारने नुकताच या संदर्भात एक मोठा निर्णय घेतला असून आज आपण याचीच सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Published on -

State Employee News : फडणवीस सरकार राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी लवकरच प्रोत्साहन भत्ता आणि ग्रॅच्युइटी देण्याबाबतचा निर्णय घेणार आहे. खरे तर सध्या राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार हा सवाल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उपस्थित केला जातोय. दुसरीकडे, आता राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता आणि ग्रॅच्युइटीचा लाभ मिळणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की राजधानी मुंबईत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या प्रोत्साहन भत्ताच्या निकषांमध्ये सुधारणा करणेबाबत तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरणाबाबत एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी सेविकांना किती प्रोत्साहन पर भत्ता मिळणार आणि ग्रॅच्यूटीबाबतचा सरकारचा प्लॅन याविषयी डिटेल माहिती दिली आहे. 

ग्रॅच्यूटीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश 

 आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्य शासकीय सेवेतील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे आता अंगणवाडी सेविकांना सुद्धा सेवा उपदानाचा म्हणजेच ग्रॅच्यूटीचा लाभ दिला जाणार आहे.

सरकारने या संदर्भातील निर्णय घेतला असून मंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवा निवृत्ती नंतर किंवा मृत्यू झाल्यास कुटुंबियांना ग्रॅच्युईटी (एकरकमी आर्थिक सहाय्य) देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आणि निर्देश निर्गमित केले आहेत.

संबंधितांना या संदर्भातील प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावेत अशा सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. यामुळे पात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लवकरच सेवा उत्पादनाची रक्कम मिळणार आहे.  

प्रोत्साहन भत्ता किती मिळणार?

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी एकत्रित केलेल्या कामाच्या निकषानुसार त्यांना प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. दरम्यान हा प्रोत्साहन भत्ता देण्याकरिता अंगणवाडी केंद्राकरिता काही निकष ठरविण्यात येणार आहेत.

प्रोत्साहन भत्ता ठरवण्यासाठी एकूण 10 निकष निश्चित केले जातील आणि या मी कशाच्या आधारावर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसारं, अंगणवाडी केंद्राने 10 पैकी 7 निकष पूर्ण केल्यास 1400 रुपये, 6 निकष पूर्ण केल्यास 1600 रुपये, 9 निकष पूर्ण केल्यास 1800 रुपये व 10 निकष पूर्ण केल्यास 2000 याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. नक्कीच शासनाच्या या निर्णयामुळे संबंधितांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe