केंद्रीय कर्मचाऱ्यांपाठोपाठ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरच्या पगारासोबत मिळणार 3% DA वाढ, पण…. 

Published on -

State Employee News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला होता. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55 टक्क्यांवरून 58% करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे ही 3% वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे. त्याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय झाला होता.

दोन टक्के महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाल्यानंतर आता वेगवेगळ्या राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातोय.

विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे आल्या आहेत हे लक्षात ठेवून बिहार राज्यातील कर्मचाऱ्यांना सुद्धा तीन टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात आला आहे. दुसरीकडे आता उत्तर प्रदेश राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढ लागू करण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे.

या निर्णयामुळे आता महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी देखील आम्हाला महागाई भत्ता वाढ कधी लागू होणार? असा प्रश्न उपस्थित करत आहेत. दिवाळी आधी महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शन धारकांना तीन टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळू शकतो अशी आशा व्यक्त करण्यात आली होती.

मात्र आज वसुबारस आणि आजपासून दिवाळीचा सण सुरू होतोय. पण तरीही अद्याप फडणवीस सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना जुलै महिन्यापासून तीन टक्के महागाई भत्ता वाढ लागू करण्याबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही.

त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये शासनाविरोधात थोडीशी नाराजी पाहायला मिळत आहे. दरम्यान आता आपण उत्तर प्रदेश राज्य शासनाने घेतलेल्या या नव्या निर्णयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

कधी मिळणार महागाई भत्ता वाढीचा लाभ?

यूपी मधील कर्मचाऱ्यांना आत्तापर्यंत 55 टक्के दराने महागाई भत्ता दिला जातो. मात्र सरकारने यामध्ये तीन टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आता युपी मधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 58% होईल.

विशेष म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात येणार असून याचा लाभ ऑक्टोबर महिन्याच्या पगारांसोबत देण्याचे आदेश राज्य सरकारकडून निर्गमित करण्यात आले आहेत. या निर्णयाचा यूपी मधील कार्यरत 16.35 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 11.52 लाख पेन्शन धारकांना फायदा होणार आहे.

तीन टक्के महागाई भत्ता वाढ एक जुलैपासून लागू राहणार असल्याने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची सुद्धा रक्कम देण्यात येणार आहे. नक्कीच गोवत्स द्वादशीच्या दिवशी झालेला हा निर्णय यूपीमध्ये लाखो कर्मचाऱ्यांच्या हिताचा राहणार असून या निर्णयाचे संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News