महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! डिसेंबर महिन्यात ‘ही’ प्रमुख मागणी मान्य होणार

Published on -

State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. खरेतर, राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारक महागाई भत्ता वाढीची आतुरतेने वाट पाहत आहेत.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना अलीकडेच महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात आला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना शासनाने तीन टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला आहे. या वाढी नंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% झालाय.

पण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आजही 55 टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय. दरम्यान, केंद्र सरकारप्रमाणे आता राज्य सरकार पण महागाई भत्ता (डी.ए) 3 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेणार आहे. याचा अधिकृत निर्णय पुढील महिन्यात निर्गमित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा व पेन्शन धारकांचा डी.ए 55 टक्क्यांवरून 58 टक्के इतका होणार आहे. विशेष म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू केली जाणार आहे. केंद्र सरकारने जुलै 2025 पासून 3 टक्के डी.ए वाढ लागू केल्याने, राज्य कर्मचारीही दीर्घकाळापासून या निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत.

खरे तर केंद्र शासनाच्या धर्तीवर विविध राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा केंद्राच्या धर्तीवर 58% झाला आहे.

राज्यात सामान्यतः केंद्र सरकारच्या धर्तीवर जुलै महिन्यातील डी.ए वाढ डिसेंबर महिन्यापर्यंत मंजूर केली जाते. मात्र सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत आणि याची आचारसंहिता सुद्धा लागू आहे यामुळे यंदा निर्णयात विलंब झाला आहे.

राज्यात नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. परिणामी, महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यास निर्बंध आहेत. यामुळे डी.ए वाढीसाठीचा प्रस्ताव सध्या होल्ड वर ठेवण्यात आला आहे.

नगरपालिका व नगरपरिषदांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होणार आहेत. परंतु, विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय विचाराधीन आहे.

याच पार्श्वभूमीवर डिसेंबर अखेरपर्यंत कर्मचाऱ्यांसाठी डी.ए वाढीचा निर्णय जाहीर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे हि वाढ जुलै महिन्यापासून लागू होणार आहे. अर्थात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना महागाई भत्ता वाढीची थकबाकी सुद्धा दिली जाणार आहे.

पण अद्याप शासनाने राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता डिसेंबर मध्ये वाढवला जाईल या संदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे खरंच पुढील महिन्यात असा काही निर्णय होणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News