राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांच्या अविवाहित, विधवा, घटस्फोटित मुलींना कुटुंब निवृत्तीवेतन मिळणार !

राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी कुटुंब निवृत्तीवेतनाचा नियमांमध्ये बदल करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरे तर, येत्या काही दिवसांनी राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे आणि त्याआधीच राज्यातील काही कर्मचाऱ्यांच्या कुटुंब निवृत्तीवेतनाच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने या निर्णयाची संबंधितांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे. 

Published on -

State Employee News : येत्या काही दिवसांनी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता 53% टक्क्यांवरून 55% वर पोहोचणार आहे. दरम्यान हा निर्णय होण्याआधीच राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

ही बातमी आहे मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेने आपल्या कुटुंब निवृत्तीवेतनाच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंब निवृत्तीवेतनाच्या नियमांमध्ये सुधारणा करत आता अविवाहित, विधवा व घटस्फोटित मुलींनाही निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाचे संबंधितांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे.

खरे तर मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या कुटुंब निवृत्तीवेतनाच्या नियमांमध्ये झालेली ही सुधारणा राज्य सरकारच्या निर्देशानुसार करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता आपण मुंबई महानगरपालिकेचा हा निर्णय नेमका कसा आहे याचा काय फायदा होणार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

मुंबई महानगरपालिकेचा निर्णय नेमका कसा आहे?

मुंबई महापालिकेने अलीकडेच घेतलेल्या या नव्या निर्णयानुसार, मानसिक किंवा शारीरिक अपंग मुलींसह, अविवाहित मुलीसाठी वयाची मर्यादा 24 वर्षे निश्चित करण्यात आली असून, तिचा विवाह होईपर्यंत किंवा ती स्वतःची उपजीविका करत नाही तोपर्यंत तिला निवृत्तीवेतन मिळत राहणार आहे. या निर्णयाची महत्त्वाची बाब अशी की विधवा किंवा घटस्फोटित मुलीला देखील, जर ती आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी नसेल, तर तिला सुद्धा कुटुंब निवृत्ती वेतन लागू राहणार आहे. 

कोणाला कुटुंब निवृत्ती वेतन मिळणार नाही?  

या निर्णयानुसार महापालिकेच्या कर्मचाऱ्याचा व त्याच्या जोडीदाराचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या घटस्फोटित मुलीचा घटस्फोट होण्यापूर्वी कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला निवृत्तीवेतन मिळत असेल, तर तिला कुटुंब निवृत्ती वेतन दिले जाणार नाही.

मात्र, पतीच्या मृत्यूनंतर विधवा झालेल्या अथवा पालिका कर्मचाऱ्याच्या हयातीत घटस्फोटासाठी अर्ज केलेल्या मुलींना, घटस्फोटाच्या तारखेपासून निवृत्तीवेतन लागू होईल असं सुद्धा या नव्या नियमात नमूद करण्यात आले आहे. नक्कीच हा निर्णय या संबंधित महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा असून या निर्णयाचे संबंधितांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News