Stock Market Bonus Share : स्टॉक मार्केटमध्ये नववर्षाच्या सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू असून यामुळे गुंतवणूकदार स्वस्त आहेत. पण या चढउताराच्या काळातच स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध असणाऱ्या एका कंपनीने मोठी घोषणा केली आहे.
सध्या स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्या आपले तिमाही निकाल जाहीर करत आहेत. खरे तर कंपनी जेव्हा तिमाही निकाल जाहीर करतात त्यावेळी बोनस शेअर देण्याबाबतचा निर्णय देखील होत असतो.
तिमाही निकाल जाहीर करताना अनेक कंपन्या बोनस शेअर देण्याची घोषणा करतात. दरम्यान संगम फिनसर्व्ह लिमिटेड या कंपनीने देखील बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने रेकॉर्ड तारीख सुद्धा निश्चित केली आहे.
अशा परिस्थितीत आज आपण या स्टॉकची गेल्या काही वर्षांमधील कामगिरी कशी राहिली आहे आणि या कंपनीच्या फ्री बोनस शेअरबाबत सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
फ्री बोनस शेअर साठीची रेकॉर्ड तारीख
संगम फिनसर्व्ह लिमिटेड कंपनीने नुकतीचं फ्री बोनस शेअर देण्याची घोषणा केली. ही कंपनी आपल्या शेअर होल्डर्सला १० रुपये दर्शनी मूल्याच्या १ शेअरवर ४ फ्री शेअर्स बोनस देणार आहे. महत्त्वाचे म्हणजे बोनस शेअर्ससाठी ७ फेब्रुवारी २०२५ ही रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे.
याचा अर्थ आता ज्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात ७ फेब्रुवारीपर्यंत कंपनीचा एक शेअर असेल त्यांच्या खात्यात ४ फ्री बोनस शेअर्स जमा केले जाणार आहेत. मंडळी या कंपनीने याआधी कधीच बोनस शेअर दिलेले नाहीत.
पहिल्यांदाच ही कंपनी आपल्या भागधारकांना बोनस शेअर देणार आहे. यामुळे सध्या या कंपनीच्या भागधारकांमध्ये अर्थातच गुंतवणूकदारांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे. कंपनीच्या या घोषणेमुळे हा स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आला आहे. दरम्यान आता आपण या स्टॉकची गेल्या काही वर्षांची कामगिरी पाहणार आहोत.
शेअरची सध्याची परिस्थिती अन मागील पाच वर्षांची कामगिरी कशी आहे ?
आज मंगळवार 28 जानेवारी 2025 रोजी संगम फिनसर्व्ह कंपनीचा शेअर तेजीत दिसलाय. हा स्टॉक 3.53 टक्क्यांनी वाढून 279.90 रुपयांवर पोहोचलाय. महत्वाची बाब म्हणजे गेल्या ६ महिन्यांत या शेअरने गुंतवणूकदारांना 160.37 टक्के इतका परतावा दिला आहे.
तसेच, मागील २ वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना ४०० टक्के परतावा दिला आहे. शिवाय मागील ५ वर्षात या शेअरने 666.85 टक्के इतका परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये सुद्धा या शेअरची कामगिरी वाखाण्याजोगी राहिली आहे.
लॉन्ग टर्म मध्ये या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 1,146.77 टक्के इतका परतावा दिला आहे. पण, या स्टॉकचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर 301.35 रुपये होता, तर ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर 68.15 रुपये इतका होता.
दरम्यान आज या स्टॉकमध्ये जी तेजी आली त्यानंतर कंपनीचे एकूण मार्केट कॅप 261 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. दरम्यान आता या कंपनीने फ्री बोनस शेअर वाटपाची घोषणा केलेली असल्याने आगामी काळात या स्टॉक ची कामगिरी कशी राहते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.