365 दिवसात गुंतवणूकदारांचे पैसे डबल, आता ‘ही’ कंपनी स्टॉक स्प्लिट करणार, रेकॉर्ड डेट आताच नोट करा

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे अमी ऑर्गेनिक लिमिटेडने स्टॉक स्प्लिट करण्याची मोठी घोषणा केली आहे. यामुळे सध्या हा स्टॉक फोकसमध्ये आहे.

Published on -

Stock Split : शेअर बाजारातील अनेक गुंतवणूकदार बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांमध्ये, स्टॉक स्प्लिट करणाऱ्या कंपन्यांमध्ये तसेच डीव्हीडेंड देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्सुक असतात. दरम्यान अशाच गुंतवणूकदारांसाठी आता शेअर मार्केट मधून एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे.

खरेतर, सध्या शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांकडून तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. सोबतच काही कंपन्या बोनस शेअरची, डिव्हीडंड देण्याची आणि स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा सुद्धा करत आहेत.

अशातच आता अमी ऑर्गेनिक लिमिटेड या कंपनीने देखील स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, आता आपण कंपनीच्या याच घोषणेबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

काय आहेत डिटेल्स?

अमी ऑर्गेनिक लिमिटेडनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार कंपनीकडून 10 रुपयांची फेस वॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत असलेल्या एका शेअरची 2 भागांमध्ये विभागणी केली जाणार आहे. अर्थात शेअरचे दोन भाग झाल्यानंतर दर्शनी किंमत 2 रुपये होईल. या घोषणेनंतर आता यासाठीची रेकॉर्ड काय असणार असा प्रश्न उपस्थित होतोय.

पण कंपनीने अजून स्टॉक स्प्लिट करण्यासाठीची रेकॉर्ड डेट निश्चित केलेली नाही. परंतु पुढील तीन महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच याची रेकॉर्ड जाहीर होईल असा अंदाज आहे. दरम्यान आता आपण या कंपनीची शेअर बाजारातील सध्याची स्थिती थोडक्यात समजून घेऊयात.

अमी ऑर्गेनिक लिमिटेडची सध्याची स्थिती ?

काल 21 फेब्रुवारी 2025 रोजी या कंपनीचा स्टॉक शेअर बाजारात घसरला. कंपनीचा स्टॉक काल 1.67 टक्क्यांनी घसरला आणि सध्या हा स्टॉक 2242 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय.

या शेअरचा मागील 52 आठवड्यांचा उच्चांक 2643.50 रुपये आहे. तर 52 आठवड्याचा निचांक 1005.05 रुपये राहिलाय. तसेच कंपनीचं सध्याचे एकूण मार्केट कॅपिटल म्हणजे बाजारमूल्य हे 9178 कोटी रुपये इतके आहे.

गुंतवणूकदारांना किती परतावा दिलाय ?

21 फेब्रुवारी 2025 रोजी या स्टॉकच्या किमती घसरल्या असल्यातरी देखील या स्टॉकने लॉंग टर्म मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. वर्षभरात या शेअरची किंमत 105 टक्क्यांनी वाढली आहे. म्हणजेच एका वर्षांपूर्वी ज्यांनी या स्टॉक मध्ये एक लाख गुंतवले होते त्या एका लाखाची किंमत आता दोन लाख रुपये झाली आहे.

तसेच गेल्या सहा महिन्यात अमी ऑर्गेनिक लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांना 70 टक्के रिटर्न दिले आहेत. गेल्या दोन वर्षात या कंपनीच्या शेअरमध्ये 139 टक्के तेजी आली आहे तर गेल्या 3 वर्षात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 152 टक्के रिटर्न दिले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe