Stock Split : IOL केमिकल्स आणि फार्मास्युटिकल्स लिमिटेडबाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर येत आहे. ते म्हणजे या कंपनीच्या स्टॉकचे विभाजन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या कंपनीने आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना अनेक वेळा डिव्हीडंट म्हणजेच लाभांश दिला आहे.
गेल्यावर्षी म्हणजे 2024 मध्ये सुद्धा कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश दिला होता. म्हणून हा स्टॉक नेहमीच गुंतवणूकदारांमध्ये चर्चेचा असतो. या स्टॉक कडे गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष असते. दरम्यान आता या कंपनीचे शेअर्स 5 भागात विभागले जाणार आहेत, अर्थातच स्टॉक स्प्लिट केले जाणार आहेत.
![Stock Split](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Stock-Split.jpeg)
एका शेअरचे पाच तुकड्यांमध्ये विभाजन होणार असून यामुळे सध्या या स्टॉकची चर्चा सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे कंपनीकडून स्टॉक स्प्लिट साठीची रेकॉर्ड डेटही आता जाहीर करण्यात आली आहे. Stock Split ची रेकॉर्ड डेट ही एक महिन्यानंतरची आहे.
दरम्यान आज आपण IOL केमिकल्स आणि फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या स्टॉक्स बाबत माहिती जाणून घेणार आहोत. शेअर बाजारात या स्टॉक ची सध्याची परिस्थिती, या कंपनीने आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना किती वेळा डिव्हीडंट दिला आहे, स्टॉक स्प्लिट साठी रेकॉर्ड काय आहे? याच मुद्द्यांची आता आपण माहिती पाहणार आहोत.
रेकॉर्ड डेट मार्च महिन्यात!
कंपनीने याबाबत एक्सचेंजला सुचित करताना रेकॉर्ड डेटचा उल्लेख केला आहे. कंपनीने म्हटले आहे की 10 रुपये दर्शनी मूल्य असलेला एक शेअर 5 तुकड्यांमध्ये विभाजित करण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला असून या स्टॉक स्प्लिटनंतर कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य प्रति शेअर 2 रुपये कमी होईल.
कंपनीने म्हटले आहे की स्टॉक विभाजनाची रेकॉर्ड तारीख मंगळवार, 11 मार्च 2025 ही निश्चित करण्यात आली आहे. या दिवशी कंपनीचे शेअर्स वितरित केले जाणार आहेत.
स्टॉकची शेअर बाजारातील स्थिती कशी आहे?
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आयओएल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या शेअरची किंमत 384.60 रुपये होती. मात्र गेल्या बारा महिन्यांचा विचार केला असता ही कंपनी या काळात फारशी चांगली कामगिरी करू शकलेली नाही.
गेल्या वर्षभरात कंपनीच्या स्टॉक मध्ये आठ टक्क्यांची घसरण झाली आहे. सध्या या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 537.05 रुपये आहे अन 52 आठवड्यांचा नीचांक 333 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप 2257.81 कोटी रुपये आहे.
किती वेळा डिव्हीडंट दिला?
ही कंपनी आपल्या ग्राहकांना वेळोवेळी डिव्हीडंट चा लाभ देत आहे. BSE कडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी 2020 पासून सतत लाभांश देत आहे.
2020 मध्ये कंपनीने एका शेअरवर 4 रुपये लाभांश दिला होता, 2021 मध्ये कंपनीने एका शेअरवर 2 रुपये लाभांश दिला होता, 2022 मध्ये कंपनीने 4 रुपये लाभांश दिला होता, 2023 मध्ये कंपनीने 4 रुपयांचा लाभांश दिला होता आणि 2024 मध्ये कंपनीने एका शेअरवर 5 रुपये लाभांश दिला होता.