17 फेब्रुवारी 2025 साठी स्टॉक मार्केट विश्लेषकांनी सुचवलेले 3 स्टॉक ! किंमत 100 रुपयांपेक्षा कमी

भारतीय शेअर बाजार सध्या कमकुवत वाटत असला तरी काही विशिष्ट शेअर्समध्ये गुंतवणुकीची संधी असल्याचे मत चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगाडिया यांनी व्यक्त केले आहे. निफ्टी 50 निर्देशांकाने 23,000 च्या महत्त्वाच्या स्तराखाली घसरण केल्यानंतरही 22,800 च्या सपोर्ट लेव्हलवरून चांगला रीबाऊंड झाला आहे.

Published on -

Stock To Buy : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजार मंदीत आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत. शुक्रवारी, म्हणजे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सुद्धा भारतीय शेअर बाजारात नरमाई दिसली.

यामुळे आता आठवड्याचा पहिला दिवस अर्थातच 17 फेब्रुवारी 2025 रोजी भारतीय शेअर बाजाराचे चित्र कसे राहणार याकडे गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष आहे. दरम्यान, भारतीय शेअर बाजार सध्या कमकुवत वाटत असला तरी काही विशिष्ट शेअर्समध्ये गुंतवणुकीची संधी असल्याचे मत चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगाडिया यांनी व्यक्त केले आहे.

निफ्टी 50 निर्देशांकाने 23,000 च्या महत्त्वाच्या स्तराखाली घसरण केल्यानंतरही 22,800 च्या सपोर्ट लेव्हलवरून चांगला रीबाऊंड झाला आहे. दरम्यान बागडिया यांनी गुंतवणूकदारांसाठी असे तीन स्टॉक सुचवले आहेत ज्यातून गुंतवणूकदारांना चांगली कमाई करता येणार आहे.

बाजाराचा पुढील कल

सुमीत बगाडिया यांच्या मते, सध्या निफ्टी 50 मध्ये कमकुवतपणा आहे, मात्र 22,800 हा सपोर्ट तीन वेळा टिकला असल्याने 23,300 ची पातळी निर्णायक असेल. जर निफ्टीने 23,300 च्या वर ब्रेकआउट दिला, तर बाजारात सकारात्मकता निर्माण होईल.

₹100 च्या आत खरेदीसाठी तीन शेअर्स

बाजारातील सध्याच्या अस्थिरतेतही, कमी किमतीत मजबूत परतावा देऊ शकणारे काही शेअर्स खरेदीसाठी योग्य ठरू शकतात. बगाडिया यांनी ₹100 च्या आत गुंतवणूक करण्यासाठी तीन शेअर्स सुचवले आहेत.

1. नॉर्बेन टी अँड एक्स्पोर्ट्स (Norben Tea and Exports Ltd) : हा स्टॉक 36.54 च्या पातळीवर खरेदी करायला हवा आणि यासाठी 39 रुपयांचे टार्गेट प्राईस बागडिया यांनी निश्चित केले असून 35 रुपयांवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

2. एन. के. इंडस्ट्रीज (N K Industries Ltd) : हा स्टॉक 72.41 रुपयांच्या पातळीवर खरेदी केला जाऊ शकतो. यासाठी 78 रुपयांचे टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आले आहे आणि 69 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्यात आला आहे.

3. राज रायॉन इंडस्ट्रीज (Raj Rayon Industries Ltd) : हा स्टॉक 23.37 रुपयांच्या पातळीवर खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे. यासाठी 25 रुपयांचे टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आले आहे आणि 22 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्यात आला आहे.

गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी

सध्याच्या अस्थिरतेमध्ये योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. मात्र, बाजारातील जोखीम लक्षात घेऊन योग्य सल्लागाराकडून मार्गदर्शन घेण्याची गरज आहे.

दरम्यान निफ्टी 23,300 च्या वर जात असल्यास, बाजारात पुन्हा तेजी येण्याची शक्यता बगाडिया यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता आगामी काळात शेअर बाजारात काय परिस्थिती राहणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe