Stock To Buy : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण होत आहे. स्टॉक एक्सचेंज कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स फेब्रुवारी महिन्यातचं आतापर्यंत सुमारे 2,300 अंकांनी घसरला आहे. यामुळे साहजिकच शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे करोडो रुपये पाण्यात गेले आहेत.
त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला असून आता शेअर बाजारात कोणते स्टॉक खरेदी केले पाहिजेत याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात भारतीय शेअर बाजारातून रक्कम काढली जात आहे.

याचा परिणाम हा शेअर बाजारावर दिसत असून स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्सवर याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. यामुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात चिंतेत आहेत.
मात्र या घसरणीच्या काळातही शेअर बाजारात लिस्टेड असणारे काही कंपन्यांचे स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देताना दिसतील असा अंदाज असून टॉप ब्रोकरेज कडून असे 3 स्टॉक सुचवण्यात आले आहेत ज्यातून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकतो.
दरम्यान आज आपण टॉप ब्रोकरेजने सुचवलेले ते तीन स्टॉक कोणते याबाबत माहिती घेणार आहोत. तसेच या स्टॉक साठी काय टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे याबाबतही माहिती पाहणार आहोत.
सुझलॉन एनर्जी : सुझलॉन एनर्जी शेअर्सची सध्याची किंमत 55 रुपये आहे. मात्र आगामी काळात या स्टॉकची किंमत आणखी वाढणार असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे. ब्रोकरेज फर्म इन्व्हेस्टिकने सुझलॉन एनर्जी लिमिटेडसाठी BUY रेटिंग दिली आहे. म्हणजेच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला असून यासाठी 70 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे.
अदानी एनर्जी सोल्यूशन्स : या यादीत दुसरा स्टॉक येतो तो अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपनीचा. हा स्टॉक सध्या 668 रुपयांवर ट्रेड करतोय. ब्रोकरेज फर्म एएलएआर कॅपिटलने अदानी एनर्जी सोल्यूशन्ससाठी BUY रेटिंग दिली आहे म्हणजेच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या स्टॉक साठी 930 रुपयांची टारगेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे.
टाटा मोटर्स : या यादीत शेवटचा आणि तिसऱ्या क्रमांकावर येणारा स्टॉक म्हणजे टाटा मोटर्सचा. टाटा समूहाचा टाटा मोटर्स लिमिटेडचा स्टॉक सध्या 672 वर ट्रेड करतोय. पण सीएलएसएने याला BUY रेटिंग दिलेली आहे.
ब्रोकरेजने याला हाई-कन्विक्शन आउटपरफॉर्म रेटिंग देण्यात आली आहे. म्हणजेच हा स्टॉक जास्तीत जास्त खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला असून यासाठी 930 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे.