Stock To Buy : शेअर मार्केटमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चढ-उतार होत आहेत आणि यामुळे गुंतवणूकदार सहाजिकच चिंतेत आहेत. मागील वर्ष तर मार्केट साठी फारच निराशा जनक राहिले आहे.
शेअर मार्केट गुंतवणूकदारांना मागील वर्षी मोठा फटका सहन करावा लागला आहे. अशा परिस्थितीत अनेक जण कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी या विचारात आपल्याला पाहायला मिळतात.

दरम्यान आज आपण तज्ञांनी सुचवलेल्या काही शेअर्स बाबत माहिती पाहणार आहोत. येस सिक्युरिटीजने High Conviction शेअर्सची यादी दिली आहे. या शेअर्समध्ये येत्या काळात चांगली वाढ होणार असा ब्रोकरेजचा अंदाज आहे.
दरम्यान आज आपण या यादीमधील टॉप 4 शेअर्स बाबत माहिती पाहणार आहोत. येथे दिलेल्या शेअर्समध्ये येत्या काळात जवळपास 26% पर्यंत वाढ होऊ शकते असा अंदाज ब्रोकरेजचा आहे.
या शेअर्समधून गुंतवणूकदारांना कमाईची सुवर्णसंधी
ऑटोमोटिव्ह एक्सल्स : शेअर मार्केट मधील मंदीच्या काळातही या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देऊ शकतात. या यादीत हा स्टॉक पहिल्या क्रमांकावर आहे. या शेअर्समधून येत्या काळात गुंतवणूकदारांना 26 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळण्याची शक्यता आहे.
कंपनीच्या कामकाजाबाबत बोलायचं झालं तर व्यावसायिक वाहनांसाठी रिअर ड्राइव्ह एक्सल्सचे उत्पादन करणारी ही एक प्रतिष्ठित कंपनी आहे. या शेअर साठी 2410 रुपयांची टार्गेट प्राईस सेट करण्यात आली आहे.
बँक ऑफ बडोदा : BOB चे शेअर्स येत्या काळात गुंतवणूकदारांना 22% पर्यंत रिटर्न देण्याची शक्यता आहे. सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेसाठी ब्रोकरेज हाऊस कडून 366 रुपयांची टार्गेट प्राईस देण्यात आली आहे.
नक्कीच ज्या लोकांना बँकिंग सेक्टरमध्ये गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी हा स्टॉक फायद्याचा राहणार आहे.
संवर्धन मदरसन इंटरनॅशनल : या शेअर साठी ब्रोकरेज हाऊस कडून बाय रेटिंग जाहीर करण्यात आली आहे. म्हणजे हे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस देण्यात आली आहे.
या शहरासाठी 143 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित झाली आहे. म्हणजेच येत्या काळात या शेअर्समधून गुंतवणूकदारांना 21 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतात.
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस : ब्रोकरेज हाऊसने या कंपनीच्या शेअर्स येत्या काळात 21 टक्क्यांपर्यंत वाढतील असा अंदाज दिला आहे. यासाठी बाय रेटिंग देतानाच 997 रुपयांची टार्गेट प्राईस देण्यात आली आहे.
रोलेक्स रिंग्ज : हा स्टॉक करंट मार्केट प्राइस पेक्षा गुंतवणूकदारांना 20 टक्के अधिक रिटर्न देणार असा अंदाज आहे. यासाठी बाय रेटिंग देण्यात आली आहे म्हणजेच हा स्टॉक खरेदी करण्याची शिफारस आहे. यासाठी 150 रुपयांची टार्गेट प्राईस सेट करण्यात आली आहे.













