Stock To Buy : भारतीय शेअर मार्केटमध्ये सध्या मोठी घसरण सुरू असून या घसरणीच्या रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओ मधील एक स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओ मधील एनसीसीचा स्टॉक लवकरच 210 रुपयांचा टप्पा गाठणार असल्याचे ब्रोकरेचे म्हणणे आहे.
खरे तर सध्या या कंपनीचा स्टॉक दबावात आहे. शेअर बाजारात हा स्टॉक मोठ्या प्रमाणात संघर्ष करताना दिसतोय. या स्टॉक मध्ये गेल्या सहा महिन्यात तब्बल 42 टक्क्यांची घसरण झाली आहे. मात्र असे असतानाही या स्टॉकवर ब्रोकरेज बुलिश आहेत.

या स्टॉक साठी टॉप ब्रोकरेज कडून बाय रेटिंग देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, आज आपण या स्टॉकची सध्याची शेअर बाजारातील स्थिती आणि ब्रोकरेजने यासाठी काय टार्गेट प्राईस दिली आहे याबाबत माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
एनसीसीच्या स्टॉकची शेअर बाजारातील सध्याची स्थिती
गेल्या सहा महिन्यात हा स्टॉक 42 टक्क्यांनी घसरला असला तरी देखील शुक्रवारी या स्टॉकच्या किमतीत नॉर्मल वाढ झाली. शुक्रवारी हा स्टॉक 2.5 टक्क्यांनी वधारून 197.70 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. मात्र यानंतर या स्टॉक मध्ये तीन टक्क्यांची घसरण झाली आणि हा स्टॉक शुक्रवारी 186.45 रुपयांवर क्लोज झाला.
गेल्या 5 वर्षांमध्ये किती परतावा दिलाय?
हा स्टॉक गेल्या तीन महिन्यांमध्ये 32 टक्के घसरला आहे आणि गेल्या 30 दिवसांमध्ये अर्थातच एका महिन्यात हा स्टॉक 23% घसरला आहे. दुसरीकडे या स्टॉकने लॉंग टर्म मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. गेल्या तीन वर्षाच्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना 193% रिटर्न दिले आहेत आणि गेल्या पाच वर्षांमध्ये हा स्टॉक 347 टक्क्यांनी वधारला आहे.
रेखा झुनझुनवाला यांची दहा टक्के हिस्सेदारी
या स्टॉक मध्ये रेखा झुनझुनवाला यांचा दहा टक्के एवढा वाटा आहे. हे मूल्य सहा कोटी 67 लाख 33 हजार 266 शेअर्स इतके आहे. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून या स्टॉक मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे. पण आता हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार असल्याचे बोलले जात आहे.
टार्गेट प्राईस काय?
या स्टॉक साठी ऍक्सीस सेक्युरिटीज या ब्रोकरेज फर्मकडून बाय रेटिंग देण्यात आली आहे. म्हणजेच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. येत्या काळात हा स्टॉक 10 टक्क्यांनी वाढणार असा ब्रोकरेजचा अंदाज आहे. सध्या हा स्टॉक 186 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय मात्र ब्रोकरेज फर्मकडून यासाठी 213 रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे.