Stock To Buy : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात सातत्याने घसरण सुरू आहे. या घसरणीच्या काळात गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरंतर शेअर बाजारात लिस्ट असणाऱ्या अनेक कंपन्या आपले तिमाही निकाल जाहीर करत आहेत, तसेच काही कंपन्यांकडून बोनस शेअरची आणि डीव्हीडेंड देण्याची सुद्धा घोषणा होत आहे.
मात्र असे असतानाही शेअर बाजार दबावातच आहे. यामुळे अनेकांना शेअर बाजारात कोणते स्टॉक खरेदी करावे? हे सुचत नाहीये. दरम्यान शेअर बाजारातील तज्ञांनी आजसाठी काही इंट्राडे स्टॉक सुचवले आहेत ज्याची आता आपण माहिती पाहणार आहोत.

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगाडिया यांनी आजसाठी 2 शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे तसेच, आनंद राठीचे वरिष्ठ व्यवस्थापक (तांत्रिक संशोधन) गणेश डोंगरे यांनी तीन स्टॉक सुचवले आहेत.
गणेश डोंगरे यांनी सुचवलेले तीन स्टॉक कोणते?
होम फर्स्ट फायनान्स : हा स्टॉक 942 रुपयांवर खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला असून यासाठी 975 रुपयांचे टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आले आहे. तसेच 915 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सुद्धा सल्ला देण्यात आला आहे.
एसआरएफ लिमिटेड : हा स्टॉक 2800 रुपयांवर खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला असून यासाठी डोंगरे यांनी 2940 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. मात्र 2700 रुपयांचा स्टॉप लॉस सुद्धा लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
गुजरात स्टेट पेट्रोनेट लिमिटेड : GSPL कंपनीचा स्टॉक आज 287 रुपयांवर BUY करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हा स्टॉक तीनशे रुपयांपर्यंत जाऊ शकतो. पण यासाठी 280 रुपयावर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सुमित बगाडिया यांनी सुचवलेले दोन स्टॉक कोणते?
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड : BEL चा स्टॉक 260.25 रुपयांवर खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला असून या स्टॉकसाठी 278 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. यासाठी 251 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
NTPC : हा स्टॉक 325.05 रुपयांवर बाय करण्याचा सल्ला देण्यात आला असून यासाठी 348 रुपयांचे टार्गेट प्राईज निश्चित करण्यात आले आहे आणि 313 रुपयांवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला सुद्धा देण्यात आला आहे.