Stock To Buy : सप्टेंबर 2024 पासून भारतीय शेअर बाजारात घसरण सुरू आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये सातत्याने घसरण होत आहे. पण, एकीकडे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण होत असतानाच दुसरीकडे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या शेअर्ससाठी 3 ब्रोकरेंज हाऊसकडून सकारात्मक संकेत दिले जात आहेत.
सोमवारी 24 फेब्रुवारी 2025 रोजी या कंपनीचे शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली, सोमवारी बाजारात मोठी घसरण होत असतानाही या कंपनीचे स्टॉक तेजित होते. सेन्सेक्समधील टॉप 30 कंपन्यांपैकी महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये आज सर्वाधिक वाढ दिसून आली.

कंपनीचे स्टॉक सोमवारी तब्बल 1.58 टक्क्यांच्या वाढीसह बंद झालेत. अशातच आता टॉप ब्रोकरेज कडून या स्टॉकसाठी चार हजार 75 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे.
अशा परिस्थितीत आज आपण महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या शेअरची सध्याची स्थिती आणि कोणकोणत्या ब्रोकरेज हाऊस कडून या स्टॉक साठी सकारात्मक संकेत देण्यात आले आहेत याबाबत माहिती पाहणार आहोत.
शेअर्सची सध्याची स्थिती
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा स्टॉक शुक्रवारी 21 फेब्रुवारी 2025 रोजी सहा टक्के घसरणीसह क्लोज झाला. तसेच गेल्या दोन आठवड्यात या कंपनीचे स्टॉक 9 टक्क्यांनी घसरले आहेत. मात्र असे असले तरी आगामी काळात हा स्टॉक चांगला परतावा देईल असे म्हटले जात आहे.
म्हणून गेल्या दोन आठवड्यात या कंपनीच्या स्टॉक मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली असली तरी देखील ही घसरण गुंतवणूकदारांसाठी एक नवी संधी घेऊन येत असल्याच्या चर्चांनी सध्या जोर पकडला आहे. आता आपण या स्टॉकसाठी ब्रोकरेज कडून काय टार्गेट प्राईज निश्चित करण्यात आली आहे, याची माहिती पाहूयात.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडसाठी टारगेट प्राईस
ब्रोकरेज फर्म बर्नस्टीनने या स्टॉकला आउटपरफॉर्म रेटिंग दिली आहे. सदर ब्रोकरेज हाऊसने या स्टॉक साठी 3650 रुपयांची टारगेट प्राईस निश्चित केली आहे. ही प्राईस शुक्रवारच्या क्लोजिंग प्राईसपेक्षा 37 टक्के अधिक आहे. म्हणजेच आगामी काळात हा स्टॉक गुंतवणूकदारांना 37% रिटर्न देऊ शकतो असे या ब्रोकरेजचे म्हणणे आहे.
तसेच, ब्रोकरेज हाऊस जेफरीजने या स्टॉक साठी बाय रेटिंग दिली आहे म्हणजेच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या ब्रोकरेज हाऊसने या स्टॉक साठी 4075 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. ही प्राइस शुक्रवारच्या क्लोजिंग प्राइस पेक्षा 53% अधिक आहे.
याशिवाय गोल्डमॅन सॅक्स या ब्रोकरेजकडून महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या स्टॉक साठी 3800 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. शुक्रवारच्या क्लोजिंग प्राईसपेक्षा ही किंमत 43% अधिक आहे म्हणजेच हा स्टॉक आगामी काळात 43% रिटर्न देणार असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे.