Stock To Buy : अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला, सहा दिवसांपूर्वी अर्थमंत्री महोदयांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला. दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्पाच्या भाषणानंतर, अनेक ब्रोकरेज कंपन्या मिड आणि स्मॉल-कॅपच्या स्टॉकला पसंती दाखवत आहेत अन अशा स्टॉक मध्ये गुंतवणूकदारांना पैसे लावण्याची शिफारस करीत आहेत.
ब्रोकरेज फर्मच्या मते, सरकारने आर्थिक पुनरुज्जीवन आणि वाढीव वापरावर लक्ष केंद्रित केल्यामुळे या शेअर्सच्या किंमती वाढू शकतात. यामध्ये झोमाटो, ट्रेंट लिमिटेड यासह अनेक स्टॉकचा समावेश आहे. दरम्यान आज आम्ही आपल्यासाठी वेगवेगळ्या ब्रोकरेज कंपन्यांनी ‘बाय’ रेटिंग दिलेल्या स्टॉकची माहिती आणली आहे.

यामुळे जर तुम्हीही अर्थसंकल्पानंतर Share Market मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. आगामी काळात शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध असणारे कोणते दहा स्टॉक गुंतवणूकदारांना चांगले परतावा देताना दिसतील याच संदर्भात आता आपण माहिती पाहणार आहोत.
UPL Share : हा स्टॉक सध्या 645 रुपयांवर ट्रेड करतोय मात्र लवकरच याची किंमत सातशे रुपयांवर जाणार असा विश्वास इन्व्हेस्टेक या ब्रोकरेज कडून व्यक्त करण्यात आला आहे. म्हणजेच या स्टॉकच्या किमती 9% ने वाढू शकतात असे सदर ब्रोकरेजचे म्हणणे आहे.
सन फार्मा : पोस्ट बजेट सिनॅरीओ मध्ये सन फार्माचा स्टॉक चांगली कामगिरी करताना दिसणार आहे. सध्या या स्टॉक ची किंमत 1,753 रुपये इतकी आहे. पण लवकरच या स्टॉक ची किंमत 2,400 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. म्हणजे या स्टॉक साठी 2400 रुपयांचे टार्गेट प्राईज ठेवण्यात आले असून या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना 36% रिटर्न मिळणार असा दावा ब्रोकरेज फर्म एमके ग्लोबल यांच्याकडून करण्यात आला आहे.
ब्रिगेड इंटरप्राइजेज : ब्रोकरेज फर्म एसबीआई सिक्योरिटीजने ब्रिगेड एंटरप्राइज यासाठी बाय रेटिंग दिली आहे. हा स्टॉक सध्या अकराशे 59 रुपयांवर ट्रेड करतोय मात्र भविष्यात हा 1335 रुपयांवर जाईल, असे ब्रोकरेजचे म्हणणे असून यातून गुंतवणूकदारांना 15 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळण्याची शक्यता आहे.
कायन्स टेक्नोलॉजी : कायन्स टेक्नॉलॉजी हा सुद्धा स्टॉक आगामी काळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा देईल असे म्हटले जात आहे. सध्या हा स्टॉक 4415 रुपयांवर ट्रेड करतोय मात्र भविष्यात याच्या किमती 5528 रुपयांपर्यंत जातील असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे. पी एल कॅपिटल या ब्रोकरेज कडून या स्टॉक साठी 5528 रुपयांचे टार्गेट प्राईज निश्चित करण्यात आले आहे. अर्थातच या स्टॉकच्या किमती आगामी काळात 25 टक्क्यांनी वाढतील असे ब्रोकरेज कडून सांगितले गेले आहे.
हैवेल्स इंडिया : हैवेल्स इंडिया स्टॉकसाठी पीएल कॅपिटल या ब्रोकरेजकडून बाय रेटिंग देण्यात आली आहे. सध्या हा स्टॉक 1606 रुपयांवर ट्रेड करतोय मात्र भविष्यात या स्टॉकच्या किमती 1890 रुपयांपर्यंत जाऊ शकतात असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे. म्हणजेच या स्टॉक मधून 14 टक्क्यांचे रिटर्न मिळतील.
एक्साइड इंडस्ट्रीज : बजाज ब्रोकिंग या ब्रोकरेज कडून एक्साईड इंडस्ट्रीज या स्टॉक साठी बाय रेटिंग जाहीर करण्यात आली असून सध्या हा स्टॉक 384 रुपयांवर ट्रेड करतोय. पण या स्टॉक साठी सदर ब्रोकरेज कडून 448 रुपयांचे टारगेट प्राईज निश्चित करण्यात आले आहे. म्हणजेच या स्टॉकच्या किमती आगामी काळात 16 टक्क्यांनी वाढतील असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे.
क्रॉम्पटन ग्रीव्स कंज्यूमर इलेक्ट्रिक : ब्रोकरेज फर्म पीएल कैपिटलने क्रॉम्पटन ग्रीव्स कंज्यूमर इलेक्ट्रिक या स्टॉक साठी बाय रेटिंग दिलेली आहे. सध्या हा स्टॉक 367 रुपयांवर ट्रेड करतोय. मात्र ब्रोकरेज कडून यासाठी 536 रुपयांची टार्गेट प्राईज ठेवण्यात आली आहे. म्हणजे या स्टॉकच्या किमती 46 टक्क्यांपर्यंत वाढतील असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे.
फाइव-स्टार बिजनेस : मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज कडून फाईव्ह स्टार बिजनेस या स्टॉक साठी बाय रेटिंग जाहीर करण्यात आली आहे. सध्या हा स्टॉक 743 रुपयांवर ट्रेड करतोय. पण याच्या किमती 25 टक्क्यांनी वाढतील असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे. या स्टॉक साठी ब्रोकरेज कडून 930 रुपयांचे टार्गेट प्राईज देण्यात आले आहे.
लेमन ट्री होटल : लेमन ट्री हॉटेल या स्टॉक साठी पी एल कॅपिटल या ब्रोकरेजने बाय रेटिंग दिलेली आहे. सध्या हा स्टॉक 148 रुपयांवर ट्रेड करतोय. मात्र लवकरच या स्टॉकच्या किमती 179 रुपयांपर्यंत जातील म्हणजेच या स्टॉक मध्ये 20 टक्क्यांची वाढ होईल असे पी एल कॅपिटल ने म्हटले आहे.
ट्रेंट लिमिटेड : ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी या स्टॉक साठी बाय रेटिंग दिली आहे. या स्टॉकची सध्याची किंमत 5 हजार 749 रुपये इतकी असून लवकरच हा स्टॉक 8,310 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. म्हणजे या स्टॉकसाठी आठ हजार 310 रुपयांचे टार्गेट प्राईस ठेवण्यात आले आहे. हा स्टॉक जवळपास 45% रिटर्न देणार असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे.