Stock To Buy : सध्या भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहेत. शेअर बाजारात अक्षरशः गोंधळाची परिस्थिती असून या गोंधळाच्या स्थितीत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. खरंतर, अनेकजण लॉंग टर्म गुंतवणुकीसाठी उत्सुक असतात.
पण, सध्या शेअर बाजारात एवढा मोठा गोंधळ सुरु आहे की कोणत्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करावी हेच गुंतवणूकदारांना समजत नाहीये. दरम्यान, आज आपण लॉन्ग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट साठी बेस्ट असणाऱ्या टॉप तीन स्टॉकची माहिती पाहणार आहोत.

मिराई अॅसेट शेअरखान या ब्रोकरेज फर्मने लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी तीन असे स्टॉक सुचवले आहेत ज्यात गुंतवणूक करून गुंतवणूकदार दीर्घ कालावधीत चांगला परतावा मिळू शकणार आहेत.
चला तर मग या ब्रोकरेजने लॉन्ग टर्मसाठी कोणते 3 स्टॉक सुचवले आहेत आणि त्यासाठी काय टार्गेट प्राईस ठरवले आहे याबाबतचा आढावा घेण्याचा प्रयत्न करूयात.
लॉन्ग टर्मसाठी हे स्टॉक ठरणार गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे
जेके लक्ष्मी सिमेंट : तुम्हाला जर लॉन्ग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर जेके लक्ष्मी सिमेंट्सचा स्टॉक तुमच्यासाठी परफेक्ट ऑप्शन ठरणार आहे. सध्या या स्टॉकची किंमत 703 रुपयांवर आहे.
मात्र सध्याच्या भावपातळीपेक्षा हा स्टॉक जवळपास 55 टक्क्यांनी वाढणार असा ब्रोकरेसचा अंदाज आहे. यासाठी ब्रोकरेजकडून 1100 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे.
पंजाब नॅशनल बँक : पंजाब नॅशनल बँकेचे शेअर्स सध्या 92 रुपयांवर ट्रेड करत आहेत. पण हा स्टॉक लवकरच आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देताना दिसणार आहे. हा स्टॉक सध्याच्या भाव पातळीपेक्षा 36 टक्क्यांनी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. यासाठी 125 रुपयांची टार्गेट प्राईस देण्यात आली आहे.
ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन : हा सुद्धा स्टॉक गुंतवणूकदारांना मालामाल बनवताना दिसणार आहे. ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचे शेअर सध्या 987 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करत आहेत मात्र यासाठी ब्रोकरेजने 1400 रुपयांची टार्गेट प्राईस ठरवली आहे. म्हणजेच सध्याच्या किमतीपेक्षा हा स्टॉक 42 टक्क्यांनी वाढणार असं ब्रोकरेजचं म्हणणं आहे.