Stock To Buy : सध्या भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये सातत्याने घसरण होत असून गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. काल बाजार थोडासा सावरला होता मात्र बाजारातील दबाव अजूनही कायमच आहे.
दरम्यान, हा 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री निमित्ताने शेअर बाजारातील व्यवहार बंद आहेत. पण आज आपण शेअर बाजारातील मंदीच्या काळातही आगामी काळात गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न देण्याची क्षमता असणाऱ्या स्टॉकची माहिती पाहणार आहोत.

ब्रोकरेज फर्म मिराई अॅसेट शेअरखानने शेअर बाजारातील मंदीच्या काळात गुंतवणूकदारांसाठी तीन असे स्टॉक सुचवले आहेत जे की येत्या बारा महिन्यांनी गुंतवणूकदारांना 66% पर्यंतचे रिटर्न देण्यास सक्षम आहेत.
हे स्टॉक गुंतवणूकदारांना देणार जबरदस्त रिटर्न
टाटा मोटर्स : सध्या भारतीय शेअर बाजार टाटा समूहाचे अनेक स्टॉक मोठा संघर्ष करताना दिसतायेत. पण Tata Motors चा शेअर येत्या बारा महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देईल असे म्हटले जात आहे. सध्या हा स्टॉक 661 रुपयांवर ट्रेड करतोय.
पण, ब्रोकरेजने यासाठी बाय रेटिंग दिली आहे, म्हणजे हा स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तसेच यासाठी 1099 रुपयांची टारगेट प्राईज निश्चित करण्यात आली आहे. अर्थात सध्याच्या किमतीपेक्षा हा स्टॉक 66 टक्क्यांनी वाढणार असा अंदाज आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स : Bharat Electronics कंपनीचा शेअर सुद्धा आपल्या गुंतवणूकदारांना पुढील बारा महिन्यांमध्ये चांगला परतावा देईल. सध्या हा स्टॉक 256 रुपयांवर ट्रेड करतोय. मात्र यासाठी ब्रोकरेजकडून बाय रेटिंग मिळालेली आहे.
या स्टॉक साठी 380 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. अर्थात हा स्टॉक आगामी काळात आपल्या गुंतवणूकदारांना 48 टक्क्यांपर्यंतचे रिटर्न देईल असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे.
ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन : Transport Corporation कंपनीचा शेअर सुद्धा या यादीत सामील करण्यात आला आहे. हा स्टॉक देखील आगामी काळात आपल्या गुंतवणूकदारांना 45% पर्यंतचे रिटर्न देण्याची क्षमता ठेवतो असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे. सध्या हा स्टॉक 961 रुपयांवर ट्रेड करतोय मात्र यासाठी ब्रोकरेज कडून 1400 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे.