‘हे’ 4 स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार श्रीमंत! शेअर बाजारातील तज्ज्ञांनी दिली बाय रेटिंग, टारगेट प्राईस आत्ताच नोट करा

Stock To Buy : भारतीय शेअर बाजारात सध्या चढ-उतार सुरू आहे. बीएसई सेंसेक्स आणि एनएसई निफ्टीमध्ये सुरुवातीचे दोन दिवस तेजी राहिली अन नंतर मात्र यात घसरन झाली. तेव्हापासून यात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळतोय.

दरम्यान बाजारातील याच चढ उताराच्या काळात शेअर बाजारातील तज्ञांनी काही स्टॉक सुचवले आहेत जे की गुंतवणूकदारांना आगामी काळात चांगला परतावा देऊ शकतात. आज आपण शेअर बाजारातील तज्ञांनी सुचवलेल्या

याच 4 स्टॉकची माहिती जाणून घेणार आहोत तसेच या स्टॉक साठी तज्ञांनी काय टार्गेट प्राईज निश्चित केली आहे याबाबतही आपण आता थोडक्यात माहिती पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या महत्वपूर्ण माहिती विषयी सविस्तर.

हे स्टॉक गुंतवणूकदारांना देणार जबरदस्त परतावा

निप्पॉन लाइफ : हा स्टॉक सध्या 600 रुपयांवर व्यवहार करतोय. पण विश्लेषकांनी यासाठी खरेदी रेटिंग दिले आहे आणि 800 रुपयांचे टारगेट देण्यात आले आहे. सध्याच्या किंमतीपेक्षा टार्गेट प्राईस 33% अधिक आहे. या स्टॉक चा 52 आठवड्याचा हाय 816 आणि लो 430 रुपये एवढा राहिला आहे.

V2 Retail : हा स्टॉक सध्या 1800 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय पण विश्लेषकांनी यासाठी बाय रेटिंग दिलेली आहे म्हणजेच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. या स्टॉकसाठी बाजारातील तज्ञांनी 2205 रुपयांची टारगेट प्राईज दिलेली आहे. याचा 52 आठवड्याचा उच्चांक हा 1950 रुपये आणि निचाँक 335 रुपये आहे.

Protean eGov : हा शेअर 1600 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय पण लवकरच याच्या किमती वाढतील. जाणकारांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला असून यासाठी 2510 रुपयांची टार्गेट प्राईज निश्चित करण्यात आली आहे. अर्थातच या स्टॉकच्या किमती 55 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

एसबीआय : हा शेअर सध्या 745 रुपयांच्या रेंजमध्ये शेअर बाजारात ट्रेड करतोय पण विश्लेषकांनी यासाठी खरेदी रेटिंग दिली आहे. हा स्टॉक 1050 रुपयांपर्यंत जाऊ शकतो असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. म्हणजे सध्याच्या किमती पेक्षा यामध्ये 41 टक्क्यांची वाढ पाहायला मिळू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe