Stock To Buy : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहे. नववर्षाचे सुरुवातीचे दोन दिवस शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. मात्र नंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टी मध्ये घसरण झाली.
तेव्हापासून सातत्याने बाजारात चढ-उतार सुरू आहे. मात्र या शेअर बाजारातील चढउताराच्या काळातही शेअर बाजारातील तज्ञांनी काही स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवणार असे सांगितले आहे.
शेअर बाजारातील तज्ज्ञांनी तब्बल असे 9 स्टॉक सुचवले आहेत जे की आगामी काळात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देणार आहेत. दरम्यान आता आपण या 9 स्टॉकसाठी शेअर बाजारातील तज्ञांनी काय टार्गेट प्राईज दिली आहे याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले यांनी हे 3 शेअर खरेदीचा सल्ला दिलाय
ॲक्सिस बँक : आठवले यांनी ॲक्सिस बँक हा स्टॉक 938 रुपयांच्या पातळीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला. त्यांनी यासाठी एक हजार रुपयांची टार्गेट प्राईज निश्चित केली आहे. त्यांचवेळी त्यांनी 914 रुपयांवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्लाही दिलाय.
M&M : हा स्टॉक 2782 रुपयांच्या पातळीवर खरेदी करण्याचा सल्ला आठवले यांनी दिला. यासाठी त्यांनी 2950 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. पण यासाठी 2730 रुपयांचा स्टॉप लॉस लावला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
SBI Life : हा स्टॉक 1426 रुपयांच्या भाव पातळीवर खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला असून यासाठी आठवले यांनी पंधराशे रुपयांचे टार्गेट प्राईज निश्चित केले आहे. यासाठी 1395 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.
बाजार तज्ञ अमित सेठने हे स्टॉक खरेदीचा सल्ला दिलाय
डाबर : अमित सेठ यांनी हा शेअर 530 रुपयांच्या पातळीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला. हा ५४५ रुपयांपर्यंत जाऊ शकतो. पण स्टॉपलॉस 518 रुपये सेट केला पाहिजे.
Sell CG Power : अमित सेठ यांनी हा शेअर ५९५ रुपयांच्या पातळीवर विकण्याचा सल्ला दिलाय. हा स्टॉक 540 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो, असे ते म्हणाले. तथापि, यासाठी 610 रुपये स्टॉपलॉस सेट केला पाहिजे.
SELL IRF Infra : अमित सेठ यांनी हा शेअर 50.26 रुपयांच्या पातळीवर विकण्याचा सल्ला दिलाय. यामध्ये 46 रुपयांची पातळी पाहता येईल, असे ते म्हणाले. तथापि, यासाठी 51.5 रुपये स्टॉप लॉस सेट केला पाहिजे.
रघुनाथ कॅपिटलचे पवन माहेश्वरी यांनी सुचवलेले तीन स्टॉक
एसआरएफ : पवन माहेश्वरी यांनी हा शेअर 2624 रुपयांच्या पातळीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला. यासाठी 2480 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवायला हवे. हा स्टॉक 2750 रुपयांवर जाऊ शकतो.
HUL : पवन माहेश्वरी यांनी हा शेअर 2401 रुपयांच्या पातळीवर खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. ते म्हणाले यासाठी 2300 चा स्टॉप लॉस ठेवला पाहिजे. त्यांनी हा स्टॉक 2600 रुपयांना टच करणार असा विश्वास व्यक्त केलाय.
SBI : एसबीआय चा स्टॉक 770 रुपयांना टच करू शकतो यामुळे हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला माहेश्वरी यांनी दिलाय. हा स्टॉक 749 च्या रेंजमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदी करायला हवा अन यासाठी 735 रुपयांचा स्टॉप लॉस देखील लावावा, असे मत माहेश्वरी यांनी व्यक्त केले आहे.