Stock To Buy : भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. दरम्यान या तेजीच्या काळात शहर बाजारात सूचीबद्ध असणारे अनेक स्टॉक सुद्धा तेजीत आले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण आहे. काल सुझलॉन एनर्जी लिमिटेडचे शेअर्स 5 टक्क्यांनी वाढले होते.
महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या तीन दिवसांपासून कंपनीच्या शेअर्समध्ये सतत वाढ होत आहे. या तीन-चार दिवसांच्या काळात कंपनीचे शेअर्स 15%पर्यंत वाढले आहेत. शुक्रवारी हा स्टॉक 58.17 रुपयांच्या इंट्रा डे वर पोहोचला.
या तेजीच्या मागे डिसेंबरच्या तिमाहीतले उत्कृष्ट परिणाम आहेत. खरं तर, डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचा नफा 90.6 टक्क्यांनी वाढून 386.9 कोटी रुपये झाला, तर Q3FY24 मध्ये ते 203 कोटी रुपये होते. सुझलॉनचा स्टॉक गेल्या काही महिन्यांमध्ये जोरदार आपटला आहे.
यात मध्यंतरी सातत्याने घट होत होती. यावर्षी कंपनीचे शेअर्स आतापर्यंत 10% पर्यंत कमी झाले आहेत. मात्र आता हा स्टॉक आगामी काळात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार असल्याचा दावा ब्रोकरेज कडून केला जातोय.
कंपनीचा महसूल वाढलाय
कंपनीच्या महसुलात 91.2% एवढी वाढ झाली आहे. कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 91.2% वाढून 2968.8 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत हा महसूल 1552.9 कोटी रुपये इतका होता.
ऑपरेशनली, कंपनीचा एबीटा 105.6 टक्के वरून दुप्पट झालाय सध्या एबीटा 493.5 कोटी रुपये इतका आहे, जो मागील वर्षी याच काळात 240.1 कोटी रुपये होता. याव्यतिरिक्त, Q3FY25 मध्ये, एबीटा मार्जिन 110 बीपीएस ने वाढून 16.6 टक्क्यांपर्यंत पोहचलाय अन Q3FY24 मध्ये ते 15.5 टक्के होते.
ब्रोकरेजचा सल्ला काय ?
आयसीआयसीआय सिक्युरिटीजने सुझलॉन एनर्जीची सुधारित टार्गेट प्राईस 68 रुपये (पूर्वी 80 रुपये) निश्चित केली आहे. पण, ब्रोकरेज फर्मने या स्टॉकवर बाय रेटिंग दिली आहे. त्याच वेळी, जेएम फायनान्शियलने स्टॉकसाठी 80 रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे.
तसेच, नुवामाने 60 रुपयांचे टार्गेट प्राईस दिले आहे. नुवामा संस्थात्मक इक्विटींनी सुझलॉन एनर्जीसाठी बाय रेटिंग दिले आहे. आधी या स्टॉक साठी होल्ड रेटिंग देण्यात आले होते मात्र आता हे अपग्रेड करून बाय रेटिंग करण्यात आली आहे. म्हणजेच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.