Stock To Buy Today : शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात घसरण होत असून यामुळे गुंतवणूकदारांची मोठे नुकसान झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात पूर्णपणे दबाव आहे. सप्टेंबर 2024 पासून भारतीय शेअर बाजारात मंदी दिसून येत असून या घसरणीच्या काळात काही स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत.
अशातच आज 27 फेब्रुवारी 2025 रोजी दोन शेअर मार्केट एक्सपर्ट 5 स्टॉक्स बद्दल उत्साही आहेत. शेअर मार्केट एक्सपर्टने आज साठी पाच इंट्राडे स्टॉक सुचवले आहेत. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगाडिया यांनी गुरुवार, 27 फेब्रुवारी रोजी दोन स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

आनंद राठीचे वरिष्ठ व्यवस्थापक (तांत्रिक संशोधन) गणेश डोंगरे यांनी सुद्धा आज 3 इन्ट्राडे स्टॉक सुचवले आहेत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.
हे 5 स्टॉक बनवणार मालामाल
वरुण बेव्हरेजेस : या स्टॉकसाठी सुमित बगाडिया मोठ्या प्रमाणात उत्साही दिसून येत आहेत. त्यांनी या स्टॉक साठी बाय रेटिंग जाहीर केली आहे अर्थात स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हा स्टॉक 499.95 रुपयांना खरेदी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या स्टॉक साठी त्यांनी 534 यांची टार्गेट प्राईस निश्चित केली असून 481 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवला आहे.
कोलगेट-पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेड : आनंद राठीचे गणेश डोंगरे यांनी 2520 रुपयांना कोलगेट-पामोलिव्ह खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यासाठी त्यांनी 2600 रुपयांची टार्गेट प्राईस आणि 2460 रुपयांचा स्टॉप लॉस निश्चित केला आहे.
Archean Chemical Industries Ltd : सुमित बगाडियाने या स्टॉकसाठी बाय रेटिंग दिलेली आहे. अर्थात हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला असून यासाठी 532 रुपयांची टार्गेट प्राईस आणि 480 रुपयांचा स्टॉप लॉस निश्चित करण्यात आला आहे. हा स्टॉक 497 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड : आनंद राठीचे डोंगरे यांनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडला 12476 रुपयांवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी त्यांनी 12,750 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केलेली आहे आणि 12250 रुपयांचा स्टॉप लॉससह हा स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे.
कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेड : डोंगरे यांनी कॅस्ट्रॉल इंडिया स्टॉकला 217 रुपयांवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे आणि यासाठी 235 रुपयांची टार्गेट प्राईस आणि 210 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवण्याची शिफारस केलेली आहे.