Tata Group च्या ‘या’ 3 कंपन्यांच्या स्टॉक्स मध्ये मोठी घसरण, स्टॉकची किंमत 52 आठवड्याच्या नीचांकावर

Published on -

Tata Group Stock : शेअर बाजारातील घसरणीचा फटका स्टॉक बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांना बसलाय. टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांना देखील याचा फटका बसला असून समूहाच्या अनेक कंपन्यांच्या स्टॉकच्या किमती आता कमी झाल्या आहेत.

दरम्यान आज आपण या समूहाच्या अशा तीन कंपन्यांच्या बाबत माहिती पाहणार आहोत ज्या कंपन्यांचे स्टॉक्स 52 आठवड्याच्या नीचांकावर आले आहेत. खरंतर, गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून आपले तिमाही निकाल जाहीर केले जात आहे.

त्यासोबतच काही कंपन्या बोनस शेअर देण्याची घोषणा करत आहेत तसेच काही कंपन्यांकडून डिवीडेंट देण्याचे सुद्धा घोषणा केली जात आहे. यामुळे शेअर बाजारात काही कंपन्यांचे स्टॉक फोकसमध्ये आले आहेत अन काही कंपन्यांचे स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत आहेत. दुसरीकडे, टाटा समूहासहित काही कंपन्यांचे स्टॉक सध्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष करतायेत.

टाटा समूहाच्या या कंपन्यांचे स्टॉक 52 आठवड्याच्या नीचांकावर

टाटा केमिकल : टाटा केमिकल या कंपनीच्या स्टॉक मध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठी घसरण झाली आहे. हा स्टॉक गेल्या एका महिन्यात 11 टक्क्यांनी अधिक घसरला आहे. शुक्रवारी, 21 फेब्रुवारी 2025 ला टाटा केमिकलचा शेअर्स एक टक्क्यांहून अधिक घसरला. या स्टॉक या दिवशी 845.20 रुपयांवर बंद झाला होता. खरेतर या स्टॉकचा 52 आठवड्यांचा नीचांक 833 रुपये आहे. म्हणजे हा स्टॉक आता या प्राईस रेंजच्या जवळ आला आहे.

टाटा कम्युनिकेशन्स : हा शेअर सुद्धा या यादीत येतो. Tata समूहाचा हा स्टॉक 52 आठवड्याच्या नीचांकाजवळ पोहचला आहे. शुक्रवारी 21 फेब्रुवारी 2025 रोजी हा शेअर्स 2.42 टक्के घसरला. या दिवशी हा स्टॉक 1451.20 रुपयांवर बंद झाला आहे. गेल्या एका महिन्यात हा स्टॉक 14 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. या स्टॉकचा 52 आठवड्यांचा नीचांक 1441 रुपये आहे. म्हणजे हा स्टॉक आता नीचांक प्राईस रेंजच्या जवळ आहे.

टाटा टेक्नॉलॉजीज : या कंपनीचा शेअर्स सुद्धा सध्या संघर्ष करतोय. सध्या हा स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांक प्राईस रेंज जवळ आला आहे. शुक्रवारी अर्थात 21 फेब्रुवारीला याचे शेअर्स 0.76 टक्के घसरले आहेत, या दिवशी हा स्टॉक 742.40 रुपयांवर बंद झाला होता. गेल्या एका महिन्याच्या काळात हा स्टॉक 7 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. शेअर्सचा 52 आठवड्यांचा नीचांक हा 710.60 रुपये आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe