Success Story : अलीकडे शेतीमध्ये कसं नाही, शेतीमधून चांगले उत्पन्न मिळत नाही असे अनेक नवयुवक शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळत. हे खरे देखील आहे. शेतीमध्ये नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असं उत्पादन मिळवता येत नाही. शिवाय शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारात चांगला भाव मिळत नाही. यामुळे शेती व्यवसायात निश्चितच अनिश्चितता आहे.
कमाईच्या बाबतीत शाश्वता, हमी नाही. पण जर शेती व्यवसायात योग्य वेळी बदल केला, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेती व्यवसाय देखील फायदेशीर ठरू शकतो हे अनेकांनी दाखवून दिले आहे. आज आपण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याच्या एका अशाच अवलीया शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्यांनी शेतीव्यवसाय आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून फायदेशीर करून दाखवला आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो सावधान ! पुढील चार दिवस ‘या’ जिल्ह्यात पडणार वादळी पाऊस; हवामान विभागाची माहिती
पुरंदर म्हटलं की सर्वप्रथम आपल्या डोळ्यापुढे उभ राहत ते अंजीरच चित्र. येथील अंजीर पार सातासमुद्रा पार गेले आहेत. अंजीरच्या शेतीतून येथील शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होत आहे. अंजीर सोबतच सीताफळ या फळ पिकाची शेती देखील पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणात होते. दरम्यान तालुक्यातील सिंगापूर येथील एका युवा शेतकऱ्याने अंजीर आणि सिताफळ लागवडीतुन लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे.
अभिजीत गोपाळ लवांडे या युवा शेतकऱ्याने 30 गुंठ्यात लागवड केलेल्या आपल्या अंजीरच्या बागेतून तब्बल दहा लाखांची कमाई केली आहे. यामुळे सध्या या युवा शेतकऱ्याची परिसरात चर्चा आहे. अभिजीत सांगतात की, कोरोना काळात त्यांची नोकरी गेली. नोकरी केल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीमध्ये आपलं नशीब आजमावायचं ठरवलं.
हे पण वाचा :- ठाणेकरांना लवकरच मिळणार गिफ्ट ! ‘या’ तीन मार्गांवर सुरु होणार एसी लोकल; रूटची माहिती इथं वाचा
त्यांच्याकडे वडीलोपार्जित नऊ एकर शेती असून चार एकर जमिनीत अंजीर तीन एकर जमिनीत सिताफळ आणि पाऊण एकर जमिनीत जांभूळ या फळ पिकाची त्यांनी शेती सुरू केली आहे. फळबाग म्हटले की पाण्याची शाश्वत उपलब्धता आवश्यक असते. यासाठी त्यांनी कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घेत शेततळे बनवले आहे. यामुळे पाण्याची शाश्वत उपलब्धता झाली असून त्यांना आता अंजीर, सीताफळ आणि जांभुळ पिकातून चांगली कमाई होत आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपल्या 4 एकर जमिनीत पुना पुरंदर या जातीच्या सहाशे रोपांची अंजीरची लागवड केली आहे. अभिजित खट्टा आणि मीठा अशा दोन्ही बहारात अंजीरचे उत्पादन घेतात. अंजीरचा बहार पकडल्यानंतर साधारणता साडेचार महिन्यांनी उत्पादन त्यांना मिळते.
एकरी साधारण 13 ते 14 टन उत्पादन त्यांना मिळत असून 80 रुपये ते शंभर रुपये प्रति किलो असा अंजीरला भाव मिळत आहे. यामुळे त्यांना चार एकरातून लाखों रुपयांची कमाई होते. अंजीर सोबतच त्यांनी तीन एकर जमिनीत सिताफळ लागवड केली असून गेल्यावर्षी यातून त्यांना साडेचार लाखांचं उत्पन्न मिळालं होतं. यासोबतच अभिजीत यांनी पाऊण एकरात जांभूळ लागवड केली असून पुढील वर्षी यादेखील बागेतून त्यांना उत्पादन मिळणार आहे.
यासोबतच त्यांनी रोपवाटिका हा शेतीपूरक व्यवसाय देखील सुरू केला आहे. यातूनही त्यांना चांगली कमाई होत आहे. ते सांगतात की, त्यांनी सेंद्रिय शेतीवर अधिक जोर दिला असून रासायनिक खतांचा कमीत कमी वापर त्यांच्या माध्यमातून होत आहे. यामुळे त्यांना शेतीमधून कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवता येणे शक्य बनलं आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! महाराष्ट्रासाठी पुढील चार ते पाच दिवस येलो अलर्ट; ‘या’ भागात होणार गारपीट, IMD चा अलर्ट