Summer Picnic Spot Maharashtra : एप्रिल महिना सुरू होऊन आता जवळपास एका आठवड्याचा काळ उलटला आहे आणि आता उन्हाची झळ अधिक तीव्र होत आहे. अनेक ठिकाणी तापमान आणि आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.
यामुळे राज्यात सध्या प्रचंड उकाडा जाणवत असून अनेकजण आता थंड हवेच्या ठिकाणी पिकनिकला जाण्याचा प्लॅन बनवत आहेत. दरम्यान जर तुमचाही असाच काहीसा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी फारच कामाची ठरणार आहे.

आज आपण महाराष्ट्रातील एका लोकप्रिय पिकनिक स्पॉट ची माहिती जाणून घेणार आहोत. या पिकनिक स्पॉटला तुम्ही जर भेट दिली तर तुम्हाला गोव्याचा सुद्धा विसर पडणार आहे.
या पिकनिक स्पॉटला नक्कीच भेट द्या
कोकणातील दापोली, महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट. या ठिकाणी दरवर्षी लाखो लोक पिकनिक साठी येतात. उन्हाळ्यात दापोलीला भेट देणाऱ्यांची संख्या अधिक असते. यामुळे जर तुमचाही उन्हाळी पिकनिकचा प्लॅन असेल तर तुम्हीही दापोलीची निवड करू शकता.
दापोलीतील समुद्रकिनारे, किल्ले, मंदिरे पर्यटकांचे आकर्षण आहे. येथे तुम्हाला कर्दे बीच, केळशी बीच, मुरूड बीच हे किनारे पाहायला मिळतात. त्यामुळे जर तुम्हाला उन्हाळ्यात समुद्रकिनाऱ्यावर जाऊन मनमुरात आनंद लुटायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी आवर्जून भेट द्यायला हवी.
गोव्यात आणि कोकणातील इतर ठिकाणी जसे सुरेख समुद्रकिनारे आहेत तसेच समुद्रकिनारे तुम्हाला दापोलीमध्येही पाहायला मिळतात. याशिवाय दाखवली मध्ये इतरही अनेक गोष्टी पाण्यासारख्या आहेत. जसे की, दापोलीला सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला लाभला आहे.
तुम्ही हा किल्ला देखील एक्सप्लोर करू शकता. इथं छोटी-मोठी अनेक मंदिरे आहेत. येथील केशवराज मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे. दापोलीतील केशवराज मंदिराच्या जवळ आसूद बाग सुद्धा आहे. म्हणून इथं गेल्यावर हर्णे बंदराला आवर्जून भेट द्या.
येथील आंजर्ले गावाला देखील तुम्ही भेट दिली पाहिजे कारण की या गावातील कड्यावरचा गणपती फारच प्रसिद्ध आहे. तसेच दापोलीच्या अगदीच जवळ असणाऱ्या उन्हवरे या गावात तुम्हाला गरम पाण्याचे कुंड सुद्धा पाहायला मिळणार आहे.