Summer Soybean Farming : सोयाबीनची महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात लागवड केली जाते. याची शेती मात्र महाराष्ट्रात विशेष उल्लेखनीय आहे. एका आडेवारीनुसार देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी सर्वाधिक उत्पादन मध्यप्रदेशात होते आणि त्या पाठोपाठ महाराष्ट्रात सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन होते. देशाच्या एकूण उत्पादनापैकी आपल्या राज्यात जवळपास 40 टक्के उत्पादन घेतले जाते. साहजिकच राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर अवलंबून आहे.
मात्र सोयाबीनची शेती ही आपल्या राज्यात प्रामुख्याने खरीप हंगामातच केली जाते. संपूर्ण देशभरात या पिकाची शेती ही पावसाळ्यातच होते. परंतु आता गेल्या काही वर्षांपासून उन्हाळी हंगामात देखील सोयाबीनची शेती होऊ लागली आहे. उन्हाळ्यात प्रामुख्याने बीजोत्पादनासाठी सोयाबीनची लागवड शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जाते. दरम्यान पुणे जिल्ह्यातही असाच एक उन्हाळी हंगामात सोयाबीन लागवडीचा कौतुकास्पद प्रयोग समोर आला आहे.
हे पण वाचा :- पंजाबरावांचा तातडीचा मॅसेज ! अवकाळी पावसाचा मुक्काम लांबला, आणखी ‘इतके’ दिवस पाऊस पडणार; पहा काय म्हटले डख…..
भोर तालुक्यातील मौजे उंबरे येथील प्रयोगशील शेतकरी पुंडलिक खुटवड यांनी उन्हाळी हंगामात सोयाबीन लागवड केली आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने या सोयाबीन पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवले आहे. यासोबतच आंबा चिकू शेवगा आवळा या बागायती पिकांची देखील खुटवड शेती करतात. यासोबतच त्यांनी इंद्रायणी भाताचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतले असून यातून त्यांना चांगली कमाई देखील झाली आहे.
यासोबतच पुंडलिक यांनी खरीप हंगामात सोयाबीन पिकाची शेती केली आहे. खरीप हंगामात लागवड केलेल्या सोयाबीन मधून त्यांना चांगले उत्पादन मिळाल्यानंतर त्यांनी उन्हाळ्यात देखील आपण सोयाबीनची शेती केली पाहिजे असा विचार केला आणि उन्हाळी हंगामात या पिकाची लागवड केली. सध्या हे सोयाबीनचे पीक जोमदार अवस्थेत असून त्यांनी उन्हाळी हंगामातील सोयाबीनचे ग्रेडिंग आणि पॅकिंग करून बियाणे म्हणून परिसरातील शेतकऱ्यांना विक्री करण्याचे नियोजन आखले आहे.
हे पण वाचा :- भारतीय हवामान विभागाचा गंभीर ईशारा; आता ‘या’ जिल्ह्यात पडणार अवकाळी पाऊस !
यासाठी त्यांना कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे देखील सहकार्य लाभत आहे. निश्चितच खरीपात येणार हे पीक आता उन्हाळ्यात देखील पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याने घेऊन दाखवले आहे. दरम्यान आता दीड महिन्यात खरीप हंगामाला सुरुवात होणार असून सोयाबीन या मुख्य पिकाची राज्यात पेरणी सुरू होणार आहे. दरम्यान पंजाबराव डख यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सुधारित जातींची पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे.
त्यांनी सांगितले की, मराठवाडा विद्यापीठाने विकसित केलेले एम ए यु एस, तसेच राहुरी विद्यापीठाने विकसित केलेली फुले किमया आणि परभणी 612 सुधारित जातींची शेतकऱ्यांनी पेरणी केली तर त्यांना अधिक उतारा मिळणार आहे. परभणी 612 ही जात एकरी 14 ते 17 क्विंटल उत्पादन देण्यास सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याशिवाय त्यांनी शेतकऱ्यांना सल्ला देताना सांगितले की, जून महिन्यात सोयाबीनची पेरणी करायची असल्यास उशिरा तयार होणाऱ्या जातीची पेरणी करावी आणि जुलैमध्ये पेरणी करायची असल्यास लवकर तयार होणाऱ्या सोयाबीन जातीची पेरणी शेतकऱ्यांनी केली पाहिजे.
हे पण वाचा :- सरकारी कर्मचाऱ्यांनो काळजी घ्या ! ‘हा’ हलगर्जीपणा केला तर बसणार मोठा दंड, आता पोलीस कार्यालयात येऊन करणार कारवाई; पहा….