11 एप्रिल 2025 ला मुंबईवरून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! कस असणार वेळापत्रक?

कोकणातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक आनंदाची आहे कारण की मुंबईहून गोव्याला एक नवीन स्पेशल ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Published on -

Summer Special Train : मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरेतर, दरवर्षी उन्हाळी हंगामात मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढते. उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुंबईत स्थायिक झालेले चाकरमानी आपल्या मूळ गावी परततात. यामुळे मात्र या काळात अनेकांना तिकीट सुद्धा उपलब्ध होत नाही.

यामुळे मुंबईहून कोकणात जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. दरम्यान जर तुम्हीही उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुंबईहून कोकणात जाण्याचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी एक अगदीच आनंदाची बातमी समोर आली आहे.

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपर्यंत मध्य रेल्वेने 284 अनारक्षित गाड्यांसह 1198 उन्हाळी विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत.

मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी दरम्यानही समर स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही गाडी येत्या दोन-तीन दिवसांनी म्हणजेच 11 एप्रिल 2025 पासून रुळावर धावणार आहे. दरम्यान आता आपण या समर स्पेशल ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कस राहणार वेळापत्रक

एलटीटी – करमाळी समर स्पेशल ट्रेन (गाडी क्रमांक 01051) 11 एप्रिल 2025 ते 23 मे 2025 या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस इथून सोडली जाणार आहे.

या काळात ही गाडी दर शुक्रवारी 22.15 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रवाना होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी करमाळा येथे बारा वाजता पोहोचणार आहे.

या समर स्पेशल ट्रेनच्या या कालावधीत एकूण सात फेऱ्या होतील अशी माहिती रेल्वे अधिकार्‍यांनी दिली आहे. तसेच करमाळी एलटीटी समर स्पेशल ट्रेन (गाडी क्रमांक 01052) 12 एप्रिल 2025 ते 24 मे 2025 या कालावधीत करमाळी रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे.

या काळात ही गाडी दर शनिवारी 14:30 वाजता रवाना होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मुंबईला चार वाजून पाच मिनिटांनी पोहोचणार आहे. या काळात या गाडीच्या सुद्धा एकूण सात फेऱ्या होणार आहेत. म्हणजे एलटीटी – करमाळी – एलटीटी समर स्पेशल ट्रेनच्या एकूण 14 फेऱ्या होतील.

कोणत्या स्थानकावर थांबणार स्पेशल ट्रेन

मध्य रेल्वे कडून चालवली जाणारी ही समर स्पेशल ट्रेन कोकणातील ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड,

नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम अशा महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. यामुळे कोकणातील प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News