सुरत – चेन्नई महामार्ग : नाशिक ते सोलापूर पहिल्या टप्प्याचे काम ‘या’ तारखेपासून सुरू होणार, भारतमाला बंद आता NHI करणार काम

सुरत - चेन्नई महामार्ग प्रकल्पाबाबत केंद्र पातळीवर हालचाली वाढल्या आहेत. या महामार्ग प्रकल्पाच्या राज्यातील महत्त्वाच्या विभागाला केंद्रातील अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. 

Published on -

Surat Chennai Expressway : केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सुरत – चेन्नई महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे प्रत्यक्षात बांधकाम सुरू होणार आहे. यामुळे या महामार्ग प्रकल्पाच्या कामाला गती मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. खरंतर भारतमाला परियोजना केंद्रातील सरकारकडून बंद करण्यात आली आणि यामुळे सुरत – चेन्नई महामार्गाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

हा महामार्ग प्रकल्प रद्द होणार की काय अशी भीती देखील व्यक्त केली जात होती. मात्र आता नाशिक मधील आडगाव ते सोलापूर दरम्यानच्या 383 किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या प्रत्यक्ष बांधकामासाठी तसेच नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मधील आंबेगाव ते सोलापूर दरम्यानच्या 413 किलोमीटर लांबीच्या भूसंपादनासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे.

प्रत्यक्ष बांधकाम आणि भूसंपादनाचे काम सुरत चेन्नई महामार्गाच्या पहिल्या टप्प्या अंतर्गत होणार आहे. दरम्यान केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून या टप्प्याला मंजुरी मिळाली असल्याने आता याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवला जाणार असून मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे.

साधारणता आगामी पंधरा दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाकडून याला मंजुरी मिळू शकते आणि त्यानंतर या प्रकल्पाचे काम सुरू होईल असे बोलले जात आहे. खरंतर या महामार्गाची घोषणा 2022 मध्ये करण्यात आली होती.

हा महामार्ग देशातील सर्वाधिक लांबीचा दुसरा महामार्ग आहे आणि याची लांबी 1250 km इतकी असून याचे चेन्नई ते अक्कलकोट पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान आता आपण या महामार्ग प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम कधी सुरू होणार आणि हा संपूर्ण महामार्ग प्रकल्प कसा आहे याची माहिती पाहणार आहोत.

सुरत चेन्नई महामार्ग प्रकल्प कसा आहे?

सुरत – चेन्नई महामार्ग 1250 किलोमीटर लांबीचा आहे. चेन्नई ते अक्कलकोट हा मार्ग तयार करण्यात आला आहे. मात्र केंद्रातील सरकारकडून भारतमाला परियोजना बंद करण्यात आले आणि म्हणूनच या महामार्गाचे काम रखडले होते. मात्र आता या प्रकल्पाचे काम स्वतः एनएचआय कडून केले जाणार आहे.

दरम्यान या महामार्गाच्या नाशिक ते सोलापूर दरम्यानच्या महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी आणि प्रत्यक्ष बांधकामासाठी अर्थ मंत्रालयाची मंजुरी मिळाली असून लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल आणि याचे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 2 सेक्शन मध्ये काम केले जाणार आहे.

हा मार्ग महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, मराठवाड्यातील बीड, धाराशिव अन पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्यांमधून जाणार आहे. खरंतर या संपूर्ण मार्गाचे सुरत ते सोलापूर आणि सोलापूर ते चेन्नई येथे दोन टप्पे करण्यात आले होते. दरम्यान या दोन प्रमुख टप्प्यांचे आणखी काही टप्पे करण्यात आलेत. यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे नाशिक ते अक्कलकोट.

या टप्प्याचे नाशिक ते अहिल्यानगर आणि अहिल्यानगर ते अक्कलकोट असे दोन सेक्शन करण्यात आले आहेत. हा मार्ग नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे समृद्धी महामार्गाला आणि नाशिक मध्ये मुंबई आग्रा महामार्गाला जोडला जाईल. यामुळे सुरत ते नाशिक दरम्यान चा सहा तासांचा प्रवास कालावधी अडीच तासांवर येणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, कळवण, दिंडोरी, नाशिक, निफाड आणि सिन्नर या सात तालुक्यांमधील 59 गावांमधून हा मार्ग जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील महामार्गासाठी एकूण 1100 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्यात 800 कोटी रुपये खर्च होणार आहे. या मार्गासाठी जिल्ह्यात एकूण 995 हेक्टर जमीन लागणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 850 हेक्टर जमिनी संपादित करावी लागेल.

नाशिक जिल्ह्यात या महामार्गाची सुरुवात सुरगाणातील राक्षसभुवन येथे होते आणि सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी येथे हा मार्ग संपतो, हे अंतर एकूण 121 किलोमीटरचे आहे. मात्र पहिल्या टप्प्यात आंबेगण ते कहांडळवाडी पर्यंतचे काम करण्यात येणार आहे. दरम्यान नाशिक ते अक्कलकोट पर्यंतचे काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रवासाचा कालावधी 9 तासांवरून चार तासांवर येणार आहे. 

दुसरा टप्पा कधी सुरू होणार? 

या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात आडगाव ते सुरत पर्यंत बांधकाम व दिंडोरीतील आंबेगण पासून सुरत पर्यंत भूसंपादन करण्यात येणार आहे. नाशिक ते सुरत याचा दुसरा टप्पा हा पूर्णपणे पर्यावरण विभागाच्या मान्यतेवर अवलंबून राहणार आहे. दुसरा टप्पा मोठ्या प्रमाणात जंगलातून जाणार असल्याने पर्यावरण विभागाचे मान्यता मिळाल्यानंतरच याचे प्रत्यक्षात काम सुरू होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!