सुझलॉन एनर्जीच्या स्टॉकमध्ये पुन्हा मोठा बदल ! स्टॉक मार्केट विश्लेषकांनी दिली BUY रेटिंग, पुढील टार्गेट प्राईस आताच नोट करा

Suzlon Energy कंपनीबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. या कंपनीचा स्टॉक आगामी काळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार असल्याचे बोलले जात आहे. इन्व्हेटेक या ब्रोकरेजकडून या स्टॉक साठी BUY रेटिंग देण्यात आली आहे म्हणजेच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हा स्टॉक काल 20 फेब्रुवारी 2025 ला 54.85 रुपयांवर क्लोज झालाय पण यासाठी आता ब्रोकरेज कडून 70 रुपयांचे नवे टारगेट प्राईस सेट करण्यात आले आहे. यामुळे हा स्टॉक शेअर बाजारात फोकस मध्ये आला असून आता हा स्टॉक कशी कामगिरी करणार हे पाहणे उत्सुकतेचे राहील.

Tejas B Shelar
Published:

Suzlon Energy Share Price : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. पण, या घसरणीच्या काळातही काही कंपन्यांचे स्टॉक सध्या शेअर बाजारात तेजीत आले आहेत. खरे तर सध्या शेअर बाजारात लिस्टेड असणाऱ्या कंपन्यांकडून आपले तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत.

सोबतच काही कंपन्या बोनस शेअर देत आहेत आणि काही कंपन्या डिव्हीडेंड देण्याची सुद्धा घोषणा करत आहेत. त्यामुळे काही कंपन्यांचे स्टॉक सध्या फोकस मध्ये आहेत. सुझलॉन एनर्जीचे स्टॉक सुद्धा सध्या फोकसमध्ये आले आहेत.

स्टॉक मार्केट विश्लेषकांनी या स्टॉकसाठी बाय रेटिंग दिली आहे. हा स्टॉक कव्हर करणाऱ्या 7 ॲनालिस्ट पैकी 5 अनालिस्टने या स्टॉकसाठी बाय रेटिंग दिली आहे आणि दोन ॲनालिस्टने याला सेल रेटिंग दिली आहे. यात ब्रोकरेज फर्म इंवेस्टेक सुद्धा सामील आहे.

ब्रोकरेज फर्म इंवेस्टेकने या स्टॉकला BUY रेटिंग दिली आहे. सध्या हा स्टॉक 54.85 रुपयांवर ट्रेड करतोय मात्र भविष्यात याच्या किमती वाढतील असा अंदाज आहे. अशा परिस्थितीत आता आपण या स्टॉकसाठी ब्रोकरेज कडून नेमका काय सल्ला देण्यात आला आहे याबाबत माहिती पाहणार आहोत.

स्टॉकची शेअर बाजारातील सध्याची परिस्थिती कशी आहे?

सुझलॉन एनर्जीचा स्टॉक 20 फेब्रुवारी 2025 ला 54.85 रुपयांवर क्लोज झाला. मात्र हा स्टॉक सध्या रेकॉर्ड हाय पेक्षा जवळपास 36 टक्के खाली ट्रेड करतोय तसेच 1 जानेवारी 2025 पासून आत्तापर्यंत हा स्टॉक 16 टक्क्यांनी घसरला आहे.

मात्र, सुझलॉन एनर्जीच्या शेअर्सने गेल्या वर्षी अवघ्या 6 महिन्याच्या काळातच 142 टक्क्यांहून अधिक परतावा दिला होता. म्हणजेच गुंतवणूकदारांचे पैसे या काळात दुप्पट झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, 14 मार्च 2024 रोजी हा शेअर 35.49 रुपयांवर होता, जो की या शेअर्सचा एका वर्षाचा नीचांक होता. पण या निम्न स्तरावरून, तो पुढील 6 महिन्यांत 142 टक्क्यांहून अधिक वाढला.

हा स्टॉक 12 सप्टेंबर 2024 रोजी 86.04 रुपयांवर पोहोचला होता. जो या स्टॉकचा एका वर्षाचा विक्रमी उच्चांक होता. पण, आता हा स्टॉक विक्रमी उच्चांकावरून 36 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. अशा या परिस्थितीत आता ब्रोकरेज फर्म इंवेस्टेककडून याला BUY रेटिंग देण्यात आली आहे.

ब्रोकरेज फर्म काय सांगत आहे?

ब्रोकरेज फर्म इन्व्हेटेकचा विश्वास आहे की, विंड इक्विपमेंट सप्लायर आणि O&M (ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स) सर्विस प्रोव्हायडर सुझलॉन एनर्जी पवन ऊर्जा क्षेत्रातील तेजीचा फायदा घेण्यासाठी सध्या फारच मजबूत स्थितीत आहे. यामुळे हा स्टॉक आगामी काळात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतो.

म्हणून इन्व्हेटेकने या स्टॉक साठी 70 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. ही टार्गेट प्राईस स्टॉकच्या सध्याच्या किमतीपेक्षा 28% अधिक आहे. म्हणजेच हा स्टॉक भविष्यात 28 टक्क्यांनी रिटर्न देण्याची क्षमता ठेवतोय असा या ब्रोकरेजचा विश्वास आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe