Suzlon Energy Share Price : आज भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेंसेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये आज घसरण झाली आणि यामुळे पुन्हा एकदा गुंतवणूकदार चिंतेत आले आहेत. खरे तर अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सातत्याने शेअर बाजारात तेजी दिसत होती.
मात्र आज शेअर बाजारात नरमाई पाहायला मिळाली. आज सुजलॉन एनर्जी या कंपनीचा स्टॉक सुद्धा शेअर मार्केटमध्ये घसरला. 7 फेब्रुवारी 2025 रोजी सुजलोन एनर्जी कंपनीचा स्टॉक 1.57 टक्क्यांनी घसरून 54.07 रुपयांवर ट्रेड करतोय.
महत्त्वाचे म्हणजे हा स्टॉक गेल्या सहा महिन्यात 22 टक्क्यांनी घसरला आहे. असे असताना सुद्धा ब्रोकरेज कडून या स्टॉक वर विश्वास दाखवला जात आहे आणि आगामी काळात हा स्टॉक आणखी वाढणार असे संकेत मिळत आहेत. ब्रोकरेज कडून या स्टॉक साठी ओवर वेट रेटिंग देण्यात आली आहे आणि नवीन टार्गेट प्राईस सुद्धा मिळाली आहे.
अशा परिस्थितीत आज आपण या स्टॉकची शेअर बाजारातील सध्याची स्थिती, गेल्या पाच वर्षात या स्टॉकची कामगिरी कशी राहिली आहे आणि यासाठी ब्रोकरेज फर्मकडून नवीन टारगेट प्राईज काय ठरवण्यात आली आहे याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Suzlon Energy स्टॉकची सध्याची स्थिती कशी आहे?
या स्टॉकची प्रिव्हियस क्लोजिंग प्राईस 54.92 रुपये होती मात्र आज हा स्टॉक 54.07 रुपयांवर ट्रेड करतोय. याचा 52 आठवड्याचा उच्चांक आणि निचाँक अनुक्रमे 86.05 आणि 35.50 इतका आहे.
सध्या या कंपनीचे एकूण मार्केट कॅपिटल 73 हजार 427 कोटी रुपये इतके आहे अन या कंपनीवर 277 कोटी रुपयांचे कर्ज आहे. मात्र येत्या काही दिवसांनी या स्टॉकची कामगिरी सुधारणार असे म्हटले जात आहे.
Suzlon Energy साठी नवीन टारगेट प्राईस काय ?
ग्लोबल ब्रोकरेंज फर्म मॉर्गन स्टॅनलीने या कंपनीसाठी दिलेली ओवरवेट रेटिंग अजूनही कायम ठेवलेली आहे. ब्रोकरेजचे असे म्हणणे आहे की हा स्टॉक आगामी काळात चांगली कामगिरी करणार आहे.
ब्रोकरेजने या स्टॉक साठी 71 रुपयांचे टार्गेट प्राईज ठेवलेले आहे. म्हणजेच हा स्टॉक 71 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो असे ब्रोकरेज कडून सांगितले गेले आहे.