सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअरमध्ये मोठी उसळी, शेअर्सच्या किमती आणखी किती वाढणार ? पहा…

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेंसेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये गत तीन दिवसांपासून चांगली वाट पाहायला मिळाली असून यामुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात उत्साही बनले आहेत. दरम्यान या उत्साहात सुझलॉन एनर्जी कंपनीचा शेअर देखील तेजीत आला आहे. या स्टॉक मध्ये सुद्धा सलग तीन दिवस तेजी दिसली आहे.

Tejas B Shelar
Published:

Suzlon Energy Share Price : सुझलॉन एनर्जी कंपनीचा शेअर गुंतवणूकदारांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. दरम्यान याच स्टॉक संदर्भात एक नवे अपडेट समोर आले आहे. खरे तर मंडळी गेल्या तीन दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात तेजी दिसत आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेंसेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये गत तीन दिवसांपासून चांगली वाट पाहायला मिळाली असून यामुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात उत्साही बनले आहेत.

दरम्यान या उत्साहात सुझलॉन एनर्जी कंपनीचा शेअर देखील तेजीत आला आहे. या स्टॉक मध्ये सुद्धा सलग तीन दिवस तेजी दिसली आहे. खरे तर कंपनीने नुकत्याच काही दिवसांपूर्वी डिसेंबर तिमाही चा निकाल जाहीर केला. तिमाही चा निकाल जाहीर केल्यानंतर गुंतवणूकदार याचे शेअर्स खरेदी करण्यासाठी गर्दी करू लागलेत. हा स्टॉक तिमाही निकाल समोर आल्यानंतर सलग दोन दिवस पाच टक्क्यांच्या वाढीसह अप्पर सर्किटवर क्लोज झाला.

महत्त्वाचे म्हणजे ब्रोकरेजकडून आगामी काळात हा स्टॉक गुंतवणूकदारांना आणखी मालामाल बनवणार असे संकेत दिले जात आहेत. अशा परिस्थितीत आज आपण ब्रोकरेज कडून या स्टॉक साठी काय नवीन टारगेट प्राईज देण्यात आली आहे, सध्या या स्टॉकची शेअर बाजारात स्थिती काय आहे? याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.

शेअर बाजारातील सध्याची स्थिती?

बुधवारी हा स्टॉक भारतीय शेअर बाजारात 52.77 वर क्लोज झाला पुढे गुरुवारी हा स्टॉक वाढीसह 55.40 रुपयांवर क्लोज झाला. दरम्यान आज शुक्रवारी पुन्हा एकदा यामध्ये तेजी दिसली आहे. हा स्टॉक आज पाच टक्क्यांच्या तेजीसह 58.17 रुपयांवर ट्रेड करत आहे.

टारगेट प्राईज काय?

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची प्राईस उच्चांकी 86 रुपयांवरून 58 रुपयांवर आली आहे, अर्थातच यामध्ये तब्बल 36 टक्क्यांची घसरण झाली आहे. दरम्यान आता या स्टॉक मध्ये पुन्हा एकदा तेजी दिसू लागली आहे. म्हणून पुन्हा हा स्टॉक 86 रुपयांपर्यंत जाणार का? आपली आधीचे भाव पातळी हा स्टॉक टच करणार का? असे प्रश्न शेअर होल्डर्स मध्ये आहेत.

दरम्यान ब्रोकरेज कडून याबाबत काही सकारात्मक इंडिकेटर समोर आले आहेत. जे एम फायनान्शिअल या ब्रोकरेज ने हा स्टॉक 80 रुपयांवर जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे. या स्टॉक साठी सदर ब्रोकरेज कडून 80 रुपयांचे टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आले आहे.

सध्याच्या किमती पेक्षा हे टार्गेट प्राईज तब्बल पस्तीस टक्के अधिक आहे. यामुळे खरंच हा स्टॉक पुन्हा एकदा 80 रुपयांच्या पातळीवर जातो का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. पण जर हा स्टॉक या पातळीपर्यंत पोहोचला तर शेअर होल्डर्सला मोठा फायदा मिळणार आहे. खरेतर, तिसऱ्या तिमाहीत कंपनीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

उत्पादन क्षमता वाढली आहे. सुझलॉन एनर्जीला एनटीपीसी, टोरंट पॉवर आणि जिंदाल रिन्युएबल्स सारख्या मोठ्या कंपन्यांकडून अनेक मोठे कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाले आहेत. या प्रकल्पांसाठी जमीन आणि राईट ऑफ वे (आरओओ) मंजूर झाल्याने ते वेळेत पूर्ण होण्याची शक्यता सुद्धा वाढली आहे. कंपनीच्या ऑर्डर बुक फार मजबूत आहे.

उत्पादनक्षमता वाढवण्यात आली आहे, ऑपरेशन साठी आवश्यक सर्व तयारी देखील पूर्ण आहे. याशिवाय न्यू लिडरशिप, सुधारित पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुरेसे कार्यशील भांडवल कंपनीला बळकटी देण्याचे काम करताना दिसतील असा विश्वास आहे. याच कारणांमुळे या कंपनीचा स्टॉक आगामी काळात तेजीत येईल असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe