Suzlon Energy Share Price : आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने भारतीय शेअर बाजार बंद आहे. मात्र काल 25 फेब्रुवारी 2025 रोजी भारतीय शेअर बाजारात थोडीशी रिकवरी पाहायला मिळाली. सेन्सेक्स काही अंकांनी वाढला तर निफ्टी मध्ये नेहमीप्रमाणेच घसरण झाली.
दरम्यान या चढउताराच्या काळात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या स्टॉकबाबत काही सकारात्मक संकेत समोर येत आहेत. टॉप ब्रोकरेज कडून या स्टॉकसाठी बाय रेटिंग देण्यात आली आहे. अर्थात हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ब्रोकरेज फर्म कडून या स्टॉकसाठी सकारात्मक संकेत दिले जात असल्याने आज आपण या स्टॉकची सध्याची शेअर बाजारातील स्थिती आणि आगामी काळात हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना किती रिटर्न देण्याची क्षमता ठेवतो? याबाबत ब्रोकरेजने काय मत व्यक्त केले आहे? ब्रोकरेजने यासाठी काय टार्गेट प्राईस निश्चित केली आहे ? याबाबत सविस्तर आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सुझलॉनची सध्याची स्थिती कशी आहे ?
25 फेब्रुवारी 2025 रोजी सुझलॉनचा स्टॉक थोडासा सुधारला. काल या कंपनीचा स्टॉक 0.17 टक्क्यांनी वधारला अन हा स्टॉक काल 54.58 रुपयांवर क्लोज झाला. सध्या सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 86.04 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांक 35.5 रुपये इतका आहे.
सध्या या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 73,891 Cr. रुपये इतके आहे. काल 25 फेब्रुवारी रोजी हा स्टॉक दिवसभर 54.27 – 55.08 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करत होता अन 54.58 रुपयांवर क्लोज झाला होता. आता आपण या स्टॉकसाठी ब्रोकरेज ने काय अंदाज दिला आहे याबाबत माहिती पाहुयात.
ब्रोकरेजने दिली बाय रेटिंग
याहू फायनान्शिअल अनालिस्ट ब्रोकरेज कडून सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या स्टॉक साठी सकारात्मक संकेत देण्यात आले आहेत. ब्रोकरेजने हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
अर्थात यासाठी बाय रेटिंग देण्यात आली असून हा स्टॉक आगामी काळात 50 टक्क्यांहून अधिकचे रिटर्न देण्याची क्षमता ठेवतो असे ब्रोकरेजला वाटते. यासाठी ब्रोकरेज ने 82 रुपयांचे टारगेट प्राईस निश्चित केलेले आहे. हे टार्गेट प्राईस सध्याच्या किमतीपेक्षा 50.79 टक्के अधिक आहे.