Suzlon Energy Share Price : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील लिस्टेड अनेक कंपन्यांचे स्टॉक सध्या संघर्ष करत आहेत. रिन्यूएबल एनर्जी कंपनी सुझलॉन एनर्जीचे शेअर्स सुद्धा घसरले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
मात्र आगामी काळात हा स्टॉक चांगला परतावा देणार असे संकेत मिळत आहेत. टॉप ब्रोकरेज कडून सुझलॉनच्या स्टॉक साठी सकारात्मक संकेत दिले जात आहेत.

खरे तर या कंपनीचा स्टॉक एकेकाळी 459 रुपयांवर होता. मात्र नंतर हा स्टॉक 1.70 रुपयांपर्यंत खाली आला. आता या नीचांकावरून हा स्टॉक 55 रुपयांपर्यंत पोहचला आहे.
सध्या कंपनीचे शेअर्स 55 रुपये आहेत. मात्र याच्या किमती आणखी वाढणार असे बोलले जात आहे. दरम्यान, आता आपण या एनर्जी स्टॉक बाबत टॉप ब्रोकरेज कडून काय सल्ला देण्यात आला आहे याबाबत जाणून घेणार आहोत.
2008 मध्ये 459 रुपयांवर होता स्टॉक
जानेवारी 2008 मध्ये या स्टॉक ची किंमत 459 रुपये एवढी होती. मात्र मार्च 2020 मध्ये या स्टॉक ची किंमत 1.58 पर्यंत कमी झाली. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये या स्टॉकच्या किमती 2300 टक्क्यांनी वाढल्या आहेत. या स्टॉकचा 52 आठवड्याचा उच्चांक 86.04 इतका आहे.
12 डिसेंबर 2024 रोजी या स्टॉकने 52 आठवड्याच्या उच्चांकाला स्पर्श केला. यामुळे हा स्टॉक गुंतवणूकदारांची नेहमीच पहिली पसंत राहिला आहे. परंतु सध्या या स्टॉक ची किंमत 55 रुपयांच्या रेंजमध्ये आहे. अशातच आता टॉप ब्रोकरेज फर्म इन्वेस्टेकने या स्टॉक साठी बाय रेटिंग दिली आहे.
या ब्रोकरेजच्या म्हणण्यानुसार लवकरच हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार आहे. सध्या हा स्टॉक 55 रुपयांच्या रेंजमध्ये असला तरी देखील यासाठी ब्रोकरेज फर्म कडून 70 रुपयांचे टार्गेट प्राईज निश्चित करण्यात आले आहे.