Suzlon चा स्टॉक गुंतवणूकदारांना देणार जबरदस्त रिटर्न! शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदारांची गर्दी, एक्सपर्ट्स सांगतात….

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये आज घसरण झाली आणि यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पण या घसरणेच्या काळात सुझलोन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या स्टॉक मध्ये थोडीशी सुधारणा दिसत आहे.

Tejas B Shelar
Published:

Suzlon Share Price : Suzlon Energy Ltd कंपनीबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. या कंपनीचा स्टॉक आगामी काळात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार असे म्हटले जात आहे. आज सोमवार 10 फेब्रुवारी 2025 रोजी भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये आज घसरण झाली आणि यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पण या घसरणेच्या काळात सुझलोन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या स्टॉक मध्ये थोडीशी सुधारणा दिसत आहे.

यामुळेच स्टॉक मार्केट विश्लेषक या स्टॉकबाबत सकारात्मक आहेत. हा स्टॉक आगामी काळात आणखी चांगली कामगिरी करताना दिसणार असल्याचे सांगितले जात आहे.

म्हणून आज आपण या स्टॉकची शेअर बाजारातील सध्याची स्थिती आणि याने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या पाच वर्षांमध्ये किती परतावा दिला आहे याची माहिती जाणून घेणार आहोत.

सुझलॉन एनर्जीच्या स्टॉकची सध्याची परिस्थिती

सुझलॉन एनर्जीच्या स्टॉकची प्रिव्हियस क्लोजिंग प्राईस 53.61 रुपये इतकी होती. आज मात्र या कंपनीचे स्टॉक 0.19 टक्क्यांनी वधारले आहेत आणि सध्या हा स्टॉक 53.71 रुपयांवर ट्रेड करतोय. हा स्टॉक आज 53.39 रुपयांवर ओपन झाला होता. यानंतर या स्टॉकच्या किमती आज थोड्या वाढल्यात.

या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 86.04 रुपये होती, तर स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 35.50 रुपये रुपये होती. सध्या सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 73,021 Cr. रुपये आहे अन कंपनीवर 277 Cr. रुपये इतकं कर्ज आहे.

सुझलॉन एनर्जी स्टॉकने गुंतवणूकदारांना किती परतावा दिलाय?

गेल्या 5 दिवसात सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा स्टॉक -5.99 टक्क्यांनी, मागील 1 महिन्यात -3.35 टक्क्यांनी, मागील 6 महिन्यात -33.16 टक्क्यांनी घसरला आहे. पण, हा स्टॉक मागील 1 वर्षात 19.36 टक्क्यांनी वधारला आहे.

दुसरीकडे YTD आधारावर हा शेअर -17.79 टक्क्यांनी घसरला आहे. पण, मागील 5 वर्षात सुझलॉन एनर्जी लिमिटेड शेअर 2445.50 टक्क्यांनी वधारला आहे. शिवाय लॉन्ग टर्ममध्ये हा स्टॉक – 56.60 टक्क्यांनी घसरला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe