Suzlon Share Price : सुझलॉन एनर्जीच्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या आणि गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. एनर्जी सेक्टर मधला हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना लवकरच मालामाल बनवणार असे संकेत मिळत आहेत.
खरे तर सध्या हा स्टॉक अचानक फोकस मध्ये आला असून गुंतवणूकदारांच्या मध्यात हा स्टॉक चर्चेत आहे. शेअर बाजारात आज 13 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थातच बुधवारी सुद्धा सुझलॉन एनर्जी चे शेअर्स चर्चेत राहिले.
![Suzlon Share Price](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Suzlon-Share-Price-1.jpeg)
दिवसाच्या सुरुवातीला घसरण झाल्यानंतर शेअरने उसळी घेतली आणि 52.95 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. मात्र, यावर्षी कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण होत असून, आतापर्यंत 20 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे.
गेल्या सहा महिन्यांत सुझलॉनच्या शेअरमध्ये तब्बल 35 टक्क्यांची घसरण झाली आहे. मात्र अलीकडे या कंपनीचे स्टॉक गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरले नसले तरी देखील आगामी काळात हा स्टॉक फायद्याचा राहील आणि यातून चांगला परतावा मिळण्याची शक्यता ब्रोकरेज कडून व्यक्त करण्यात आली आहे.
कारण की आज या स्टॉक मध्ये सुधारणा पाहायला मिळाली आहे. तसेच कंपनीला एक नवीन ऑर्डर मिळाली असल्याने भविष्यातही या कंपनीचे स्टॉक असेच तेजीत राहण्याची शक्यता आहे.
नवीन ऑर्डरमुळे शेअरमध्ये सुधारणा
सुझलॉन एनर्जीने 12 फेब्रुवारी रोजी जाहीर केले की त्यांना ऑयस्टर रिन्यूएबल्स कडून 201.6 मेगावॅटची नवीन ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर मिळाल्यानंतर कंपनीच्या एकूण ऑर्डर बुकिंगची क्षमता 5.7 गिगावॅट वर पोहोचली आहे, जी आतापर्यंतची उच्चांकी पातळी मानली जात आहे.
विशेष म्हणजे, मध्य प्रदेशात सुझलॉन आणि ऑयस्टर रिन्यूएबल्स यांच्यातील सहकार्य फक्त नऊ महिन्यांत 283.5 मेगावॅटपर्यंत वाढले आहे. राज्यातील नवीकरणीय ऊर्जा पायाभूत सुविधांना त्यामुळे आणखी गती मिळत आहे. ही ऑर्डर मिळाल्यानंतर, सुझलॉनने पवन ऊर्जेच्या क्षेत्रात आपली मजबूत स्थिती कायम ठेवली आहे.
सुझलॉनसाठी नवीन टार्गेट प्राईस काय?
सुझलॉनच्या या सुधारणेच्या पार्श्वभूमीवर, मॉर्गन स्टॅनली या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय गुंतवणूक संस्थेने सुझलॉन शेअरवर आपले ‘ओव्हरवेट’ रेटिंग कायम ठेवले आहे. त्यांनी प्रति शेअर 71 रुपये टारगेट प्राईस निश्चित केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नव्या संधीबाबत उत्साह निर्माण झाला आहे.
सुझलॉनच्या गुंतवणूकदारांसाठी संधी ?
विश्लेषकांच्या मते, नवीन ऑर्डर्स आणि हरित ऊर्जेवरील भर यामुळे सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये लवकरच पुन्हा तेजी येऊ शकते. जर शेअरने 71 रुपयांची पातळी गाठली, तर गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकतो. मात्र, बाजारातील अस्थिरता लक्षात घेता, गुंतवणूकदारांनी विचारपूर्वक आणि दीर्घकालीन दृष्टीकोन ठेऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जात आहे.