Swiggy Share Price : Swiggy चा स्टॉक शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये नेहमीच चर्चेचा राहतो. दरम्यान आता याच स्टॉकबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीचा शेअर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरत आहे. सध्या हा स्टॉक 3 टक्क्यांहून अधिक घसरलाय अन याची किंमत 374.80 रुपयांवर आली आहे.
आज, शुक्रवारी 7 फेब्रुवारी 2025 रोजी कंपनीच्या स्टॉकने 52 आठवड्यांचा नीचांक गाठला. मंडळी Swiggy च्या आयपीओची प्राईस 390 एवढी होती मात्र आता या किमतीपेक्षा हे स्टॉक खाली आले आहेत. स्विगीचे शेअर्स त्यांच्या आयपीओच्या किमतीच्या खाली आले असल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
याच्या IPO मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत 390 रुपये होती. मात्र सध्या हा स्टॉक 374.80 रुपयांवर ट्रेड करतोय, म्हणजे कंपनीचे शेअर्स 617 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावरून जवळपास 40 टक्क्यांनी घसरले आहेत. या घसरणीनंतरही बाजारातील तज्ज्ञांना कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली वाढ अपेक्षित असल्याचे निरीक्षण या ठिकाणी नोंदवले आहे.
तज्ज्ञांच्या मते स्विगीचे शेअर्स 750 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. म्हणजेच या स्टॉकच्या किमती आगामी काळात 100% पर्यंत वाढतील असे मत स्टॉक मार्केट विश्लेषकांकडून व्यक्त होताना दिसते. यामुळे पुन्हा एकदा हा स्टॉक चर्चेचा विषय ठरत आहे.
Swiggy चे स्टॉक किती वाढणार?
ग्लोबल ब्रोकरेज हाऊस CLSA ने स्विगी शेअर्सवर उत्कृष्ट रेटिंग कायम ठेवली आहे. ब्रोकरेज हाऊसने या अन्न वितरण कंपनीच्या शेअर्ससाठी 750 रुपयांची टारगेट प्राईज सेट केलेली आहे. म्हणजेच, सध्याच्या शेअर्सच्या किमतीवर नजर टाकली तर स्विगीच्या शेअर्समध्ये जवळपास 100 टक्के वाढ पाहायला मिळु शकते असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे.
तसेच ब्रोकरेज हाऊस बर्नस्टीनने सुद्धा या स्टॉकसाठी आउटपरफॉर्म रेटिंग दिली आहे अन स्विगी शेअर्ससाठी 575 रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे. मात्र ब्रोकरेज हाऊस मॅक्वेरीचा स्विगीबाबत वेगळा दृष्टिकोन आहे. ब्रोकरेज हाऊसने कंपनीच्या शेअर्सवर अंडरपरफॉर्म रेटिंग कायमच राखले आहे आणि यासाठी 225 रुपयांची टार्गेट प्राईस ठेवलेली आहे.
कंपनीचा तोटा आणखी वाढला
कंपनीने डिसेंबर तीमाईचा निकाल जाहीर केला आहे आणि या चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत स्विगीचा तोटा आणखी वाढला आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आणखीन अस्वस्थता पाहायला मिळत आहे. डिसेंबर 2024 च्या तिमाहीत या कंपनीचा तोटा 39 टक्क्यांनी वाढून 799 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
वर्षभरापूर्वी याच तिमाही काळात स्विगीला ५७४ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. ऑक्टोबर-डिसेंबर 2024 तिमाहीत, स्विगीचा महसूल वार्षिक आधारावर 31 टक्क्यांनी वाढून 3993 कोटी रुपये झाला. वर्षभरापूर्वी याच कालावधीत कंपनीचा महसूल ३०४९ कोटी रुपये होता.
Swiggy चा IPO 6 नोव्हेंबर 2024 रोजी सट्टेबाजीसाठी खुला होता आणि तो 8 नोव्हेंबरपर्यंत खुला होता. IPO मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत 390 रुपये होती. स्विगी शेअर्स 13 नोव्हेंबर 2024 रोजी बीएसईवर 412 रुपयांना सूचीबद्ध झाले होते. लिस्टिंगच्या दिवशीच कंपनीच्या शेअर्सने 455.95 रुपयांपर्यंत झेप घेतली.
मात्र आता कंपनीचा स्टॉक आयपीओ प्राईस पेक्षा कमी झाला आहे. मात्र असे असतानाही काही ब्रोकरेज फर्म या स्टॉक साठी उत्साही दिसून येत आहेत आणि आगामी काळात हा स्टॉक मोठ्या प्रमाणात परतावा देणार असे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे आता खरच भविष्यात हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना 100% पर्यंत रिटर्न देणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.