Swiggy च्या स्टॉकमध्ये मोठी घसरण ! किंमत 300 पर्यंत खाली जाणार की 500 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार ? तज्ञ काय सांगतात….

आज या स्टॉकच्या किमती 359 रुपयांपर्यंत खाली आल्या आहेत. दरम्यान, गेल्या पाच दिवसांत त्यात 22% पर्यंत घसरण झाली आहे. तसेच, सलग तिसऱ्या दिवशी या कंपनीच्या शेअर्समध्ये 5% पेक्षा जास्त घसरण झाली आहे.

Published on -

Swiggy Share Price : शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणात घसरण दिसली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेंसेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये आज घसरण पाहायला मिळाली असून या घसरणीच्या काळात आज 10 फेब्रुवारी 2025 रोजीच्या शेअर बाजारातील ट्रेडिंगमध्ये स्विगी लि. च्या स्टॉकमध्ये सुद्धा 6 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.

यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता दिसत आहे. स्टॉकच्या किमती आणखी खाली जाणार, की यामध्ये वाढ होणार हा मोठा प्रश्न गुंतवणूकदारांना सतावत आहे. खरेतर, आज कंपनीचा शेअर ५२ आठवड्यांचा नीचांकी पातळीवर पोहोचला. आज या स्टॉकच्या किमती 359 रुपयांपर्यंत खाली आल्या आहेत.

दरम्यान, गेल्या पाच दिवसांत त्यात 22% पर्यंत घसरण झाली आहे. तसेच, सलग तिसऱ्या दिवशी या कंपनीच्या शेअर्समध्ये 5% पेक्षा जास्त घसरण झाली आहे. दरम्यान, विश्लेषकांनी या क्विक कॉमर्स व्यवसायासाठी त्यांच्या नुकसानीचे अंदाज आणखी वाढवले ​​आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार आता अधिकच हैराण झालेत.

विश्लेषकांचे म्हणणे आहे की, स्विगीच्या इन्स्टामार्ट आणि झोमॅटोच्या ब्लिंकिटमधील अंमलबजावणीचे अंतर रुंदावत असल्याचे प्रारंभिक संकेत आहेत. खरंतर कंपनीने नुकत्याच काही दिवसांपूर्वी तिमाही निकाल जाहीर केलेत. अशा परिस्थितीत आता आपण कंपनीचे तिमाही निकाल कसे राहिले आहेत आणि या स्टॉकबाबत ब्रोकरेचे म्हणणे नेमके काय आहे? याचा एक थोडक्यात आढावा घेणार आहोत.

कंपनीचे तिमाही निकाल कसे आहेत?

स्विगी एक ऑनलाइन ऑर्डर घेणारी अन्न आणि किराणा वितरण कंपनीचा एकत्रित निव्वळ तोटा हा वाढला आहे. या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 799.08 कोटी रुपयांपर्यंत वाढला असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे.

गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला 574.38 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. या तिमाहीत कंपनीचा खर्च सुद्धा वाढला आहे, आर्थिक वर्ष 2023-24 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी कंपनीचा एकूण खर्च 3,700 कोटी रुपयांवरून 4,898.27 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.

कंपनीचे परिचालन उत्पन्न देखील या तिमाहीत रु. 3,048.69 कोटींवरून वाढून रु. 3,993.06 कोटी इतके झाले आहे. तिमाही निकालानंतर कंपनीचे स्टॉक दिवसेंदिवस घसरत आहेत. दरम्यान, आता आपण कंपनीबाबत ब्रोकरेजचं म्हणणं काय आहे? हे पाहुयात.

ब्रोकरेजचा सल्ला काय?

एचडीएफसी इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने या स्टॉकबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. यानुसार, कंपनीचा खाद्य वितरण व्यवसाय अजूनही स्थिर आहे. पण, झटपट वाणिज्य व्यवसायांमध्ये अंमलबजावणीची तफावत वाढत असल्याची प्रारंभिक चिन्हे असल्याचे सांगितले गेले आहे. या स्टॉकसाठी 455 रुपयांचे प्रति शेअर इतकी टार्गेट प्राईस देण्यात आली आहे अन या किंमतीसह Swiggy साठी डाउन रेटिंग कायमच आहे.

ब्रोकरेजने असे सांगितले आहे की, Swiggy ची द्रुत वाणिज्य अंमलबजावणी अपेक्षेपेक्षा कमी झाली आणि Q3 मध्ये Blinkit पेक्षा मागे पडली आहे. UBS ने Swiggy चे Q3 परिणाम त्याच्या अपेक्षेपेक्षा कमी पडलेत, द्रुत वाणिज्य व्यवसाय ढोबळ ऑर्डर मूल्य कार्यक्षमतेच्या म्हणजे GOV ची वाढ आणि मार्जिन अंदाजापेक्षा आणि झोमॅटोच्या तुलनेत नकारात्मक राहिलेत.

तथापि, ब्रोकरेजने त्यावर 515 रुपयांचे टार्गेट प्राईस ठेवलेले आहे. एलारा सेक्युरिटीज ने मात्र या स्टॉक साठी तीनशे रुपयांचे टार्गेट प्राईज दिले आहे. यामुळे हा स्टॉक तीनशे रुपयांपर्यंत खाली येणार की पाचशे रुपयांचे टार्गेट प्राईज गाठणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News