एकदिवसीय नंतर आता टी20 ! भारत-विंडीज टी २० मालिका आजपासून रंगणार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आता भारत पुढील टी २० मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. आज भारत आणि विंडीज यांच्यातील ३ सामन्यांच्या टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे.

आज होणारा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स क्रिकेट मैदानावर सायंकाळी ७:०० वाजता खेळवण्यात येणार आहेत. सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर करण्यात येणार आहे.

या मालिकेसाठी सोमवारी १४ फेब्रुवारी २०२२ रोजी टीम इंडिया कोलकाता येथे दाखल झाली आहे. टीम इंडियाने आपलं सराव शिबीर सुरु केले आहे.

मात्र टी २० मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाला तीन मोठे धक्के बसले आहेत. सलामीवीर लोकेश राहुल आणि अष्टपैलू अक्षर पटेलने मालिकेतून दुखापतीमुळे माघार घेतली होती.

या दोन्ही खेळाडूंसाठी पर्यायी खेळाडू म्हणून भारतीय संघात दीपक हुडा आणि ऋतुराज गायकवाडला संधी देण्यात आली आहे. तसेच अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेला मुकणार आहे. त्याच्याजागी कुलदीप यादवला संघात संधी मिळाली आहे.

भारत टी २० संघ :-ईशान किशन, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, व्यंकटेश अय्यर, दीपक चाहर, शार्दूल ठाकूर, रिषभ पंत, रवी बिष्णोई, युझवेन्द्र चहल, कुलदीप यादव, मोहंमद सिराज, हर्षल पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार.

विंडीज टी २० संघ:- कायरन पोलार्ड, ब्रॅंडन किंग, शाई होप, डॅरेन ब्रावो, फेबिअन अलेन, जेसन होल्डर, अकील हुसेन, रोमॅरिओ शेफर्ड, निकोलस पुरण, ओडेन स्मीथ, रोवमन पॉवेल, रोस्टर्न चेस, हेडन वॉल्श, कायल मेअर्स, शेल्डन कोटरेल, डोमिनिक ड्रेक्स.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe