Taj Hotel News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईतील ताज हॉटेल देशातील सर्वात महागड्या हॉटेलच्या यादीत येते. ताज हॉटेल ही मुंबईची शान आहे, जगभरातील प्रतिष्ठित हॉटेल्स मध्ये ताज हॉटेलचा समावेश केला जातो.
ताज हॉटेल इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड अर्थातच आयएचसीएल कडून संचालित केली जाते. दरम्यान, इंडियन होटल्स कंपनी लिमिटेड (IHCL) नं तब्बल 1 लाख कोटी रुपयांचा मार्केट कॅप अर्थात कंपनी मूल्य गाठलं आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे असा विक्रम करणारी ही पहिली भारतीय हॉस्पिटॅलिटी कंपनी सुद्धा बनली आहे आणि यामुळे सध्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड ची जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान आज आपण याच कंपनीकडून चालवल्या जाणाऱ्या ताज हॉटेलच्या बाबत एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. ताज हॉटेलमध्ये एक दिवस मुक्काम करायचा असल्यास रूमचे भाडे किती लागणार? या संदर्भातील माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
ताज हॉटेल मधील मुक्कामासाठी किती पैसे खर्च करावे लागतील ?
ताज हॉटेलमध्ये मुक्काम करावा, असं तुम्हालाही वाटतं का? पण ताज हॉटेलमध्ये मुक्काम करण्यासाठी तुम्हाला किती पैसे खर्च करावे लागतील, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नाही ना मग आज आपण याच संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
खरे तर ताज हॉटेलमध्ये जाणे प्रत्येकालाच परवडणारे नाही. ताज हॉटेल मधील रूमचे भाडे हे इतर हॉटेलच्या तुलनेत फारच अधिक आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सध्या द ताज महाल पॅलेसमधील सर्वात महागड्या रुममध्ये मुक्काम करण्यासाठी तब्बल आठ लाख रुपयांचा खर्च येतोय.
तसेच ताज क्लब रून सिटी व्ह्यू या रूमसाठी 28 हजार रुपये, ताज क्लब रून सी व्ह्यू रूमसाठी 32 हजार रुपये, एक्झिक्युटीव्ह सुईट वन बेडरून सिटी व्ह्यू साठी 51,000 ते 62 रुपये, लक्झरी सुईट वन बेडरुम सिटी व्ह्यू साठी 59,500 ते 72,000 आणि ग्रँड लक्झरी वन बेडरुम सी व्ह्यू रूमसाठी 93,500 ते 1,12,000 इतके भाडे लागते.
याशिवाय ताज हॉटेलमध्ये लक्झरी रुम, लक्झरी ग्रँड रुम सिटी व्ह्यू, , लक्झरी ग्रँड रुम सी व्ह्यू, सिग्नेचर सुईट आणि द टाटा सुईट सुद्धा उपलब्ध आहेत आणि याचे भाडे सुद्धा फारच अधिक आहे. एकंदरीत ताज हॉटेल मधील सर्वात महागड्या रूमचे भाडे हे तब्बल आठ लाख रुपये एवढे आहे.
1903 मध्ये किती होतं ताज हॉटेलच्या रूमचं भाडं?
आज ताज हॉटेल मधील सर्वात महागड्या रूमचे भाडे आठ लाख रुपये एवढे आहेत आणि इतरही रूम्स चे भाडे हजारो रुपयांमध्ये आहे. पण असं सांगितलं जातं की सण 1903 मध्ये ताज हॉटेलमध्ये एका दिवसाच्या मुक्कामासाठी फक्त सहा रुपये एवढे भाडे लागत होते.
याबाबतची अधिकृत माहिती हाती आलेले नाही पण सोशल मीडियामध्ये असा दावा केला जातो की 1903 साली ताज हॉटेलमध्ये मुक्काम करण्यासाठी फक्त सहा रुपये एवढे रूम भाडे लागत होते.