Prajakt Tanpure : सत्ताधाऱ्यांकडून तनपुरेंचा मोठा सन्मान नागरिक प्रेमात ! विखे – कर्डिलेंसह विरोधकांना चपराक

सुरवातीला अडीच वर्ष सत्तेत मंत्री त्यानंतर सत्तांतर झाल्यानंतर आमदार म्हणून त्यांची भूमिका सुसंस्कृत राजकारणी म्हणून राहिली. गर्वहीन बोलणे, कसलाही आब न राखता सर्वसामान्यात मिसळणे, विधानसभेत विरोधक जरी असला तरी मवाळ धोरण राखत त्याच्याशीही त्याला मान देत बोलणे हे आ. तनपुरे यांचे वैशिष्ट्य.

Published on -

माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे हे राज्यात अनेकदा चर्चेत राहिलेत. कधी त्यांच्या राजकारणातील नातगोत्यांमुळे, तर कधी इतर कारणांमुळे. पण त्यांना नेहमी चर्चेत ठेवणारी ही कारणं बऱ्याच अंशी सकारात्मक असत. नकारात्मक गोष्टी किंवा वक्तव्य करून चर्चेत राहणारे नेते अनेक आहेत. परंतु बऱ्याचदा चर्चेत राहायचं आणि तेही सकारात्मक कारणांमुळेच असे अगदी बोटावर मोजण्याजोगे नेते. त्यापैकी एक म्हणजे प्राजक्त तनपुरे. राहुरीचे नगराध्यक्ष आणि मग नगराध्यक्ष असतानाच 2019 साली विधानसभा निवडणूक लढवून, राज्याच्या विधानसभेत प्रवेश आणि लगेचच सहा खात्यांचे राज्यमंत्री, असा अगदी एका हाताच्या बोटावर मोजता येईल, इतक्याच वर्षांचा राजकीय प्रवास आहे.

सुरवातीला अडीच वर्ष सत्तेत मंत्री त्यानंतर सत्तांतर झाल्यानंतर आमदार म्हणून त्यांची भूमिका सुसंस्कृत राजकारणी म्हणून राहिली. गर्वहीन बोलणे, कसलाही आब न राखता सर्वसामान्यात मिसळणे, विधानसभेत विरोधक जरी असला तरी मवाळ धोरण राखत त्याच्याशीही त्याला मान देत बोलणे हे आ. तनपुरे यांचे वैशिष्ट्य. त्यांच्या याच गुणांमुळे, सुसंस्कृतपणामुळे अन त्यांच्या अभ्यासपूर्व प्रश्न मांडण्याच्या पद्धतीमुळे त्यांची नुकतीच राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या वतीने २०२३-२४ सालासाठी विधिमंडळातील सर्वोत्कृष्ट भाषणासाठी देण्यात येणाऱ्या ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. विशेष म्हणजे विरोधी सरकार सत्तेत असताना त्यांना हा पुरस्कार मिळाला. नेमका काय आहे हा पुरस्कार? विरोधी सरकार असतानाही कसा मिळाला हा पुरस्कार? विधिमंडळ ते अगदी अहमदनगरच्या राजकारणापर्यंत कसा आहे आ. तनपुरे यांचा दबदबा? सत्ताधार्यांनीच पुरस्कार दिल्याने विखे कर्डिलेंसह विरोधकांना चपराक बसलीये का? याच विषयाचा हा आमचा स्पेशल रिपोर्ट.

सर्वात आधी आपण तनपुरे यांचा अहमदनगर जिल्ह्यासह एकंदरीत राजकारणात कसा दबदबा आहे ते एकदा पाहुयात. अहमदनगर जिल्ह्याला तनपुरे हे आडनाव नवं नाही. गेल्या चार-पाच दशकांपासून नगरमधील राजकारणात तनपुरे आडनावाचा दबदबा कायम असल्याचे दिसून येतं. अहमदनगरच्या राजकारणात तनपुरे हे आडनाव गेली पाच-सहा दशकं आपला दबदबा राखून आहे. बाबूरावदादा म्हणजे प्राजक्त तनपुरेंचे आजोबा. प्रसाद तनपुरे हे प्राजक्त तनपुरेंचे वडील. प्रसाद तनपुरे हेही राजकारणात अनेक वर्षे सक्रीय होते. एकदा खासदार आणि पाचवेळा आमदार अशी मोठी कारकीर्द त्यांनी संसदीय राजकारणात घालवली.

इतकेच नव्हे तर राहुरीच्या माजी नगराध्यक्षा डॉ. उषा तनपुरे या प्राजक्त तनपुरेंच्या आई. या डॉ. उषा तनपुरे दिवंगत नेते राजारामबापू पाटील यांच्या कन्या होय. म्हणजेच, महाराष्ट्राचे विद्यमान जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे डॉ. उषा तनपुरेंचे सख्खे भाऊ आणि प्राजक्त तनपुरेंचे सख्खे मामा आहेत. एकंदरीतच आ. तनपुरे यांचे वलय व त्यांचा राजकीय दबदबा हे तुम्हाला चांगलेच समजले असेल. आता एकीकडे साधे राजकीय पद मिळाले तरी गुर्मीत राहणारी काही राजकीय मंडळी तुम्हाला ठाऊकच असतील. पण हे सर्व असतानाही हुशारी, शांतता, संयमी बोलणं आदी गुण त्यांच्यात आहेत. त्यामुळे त्यांच्या गुणांची कदर अगदी विरोधकांनीही केली. व त्यांना ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार देण्यात आला.

आता आपण नेमका हा पुरस्कार आहेतरी काय ते पाहुयात..
अभ्यासपूर्ण विषय मांडणी, सर्व विधीमंडळ सदस्यांचा मान राखत भाषण करण्याची पद्धती, सुसंस्कृत व मुद्देसूद बोलणे व प्रश्नांची मांडणी यामुळे तनपुरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार देण्यासाठी जी समिती असते त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांसह सरकारमधील काही सदस्य असतात. यावरूनच तुमच्या लक्षात आले असेल की विरोधात असतानाही सत्ताधाऱ्यांनी तनपुरे यांची दखल घेतली. यावरूनच विकास पुरुष, संयमी व्यक्तिमत्व, सर्वात महत्वाचे म्हणजे सुसंस्कृत राजकारणी ही त्यांची बिरुदावली अगदी सार्थ ठरल्याचे बोलले जात आहे. आता त्यांच्या उच्च वैचारिकतेचा झलक तर यापुढे मिळते. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल गावकर्यांनी, मतदार संघातील नागरिकांनी त्यांचा भव्य सत्कारही आयोजित केला आहे, पण ही भव्यदिव्यता नको असं म्हणत त्यांनी या सत्काराचे नियोजन करायला नको होते असेही बोल आयोजकांना सुनावले असल्याचे बोलले जात आहे.

इतकेच नव्हे तर तनपुरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, विधीमंडळात जनहिताचे मुद्दे मांडताना शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन तसेच माझ्या मतदारसंघातील जनता यांच्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. म्हणूनच हा बहुमान मी माझ्या मतदारसंघातील जनता, आई-वडील तसेच वडीलधाऱ्या नेतृत्वाला कृतज्ञतापूर्वक समर्पित करतो. यावरूनच त्यांचा साधेपणा दिसून येतो. दरम्यान आता सत्ताधार्यांनीच हा पुरस्कार दिला असल्याने मात्र विखे-कर्डीले यांसारखे विरोधक मात्र आता मोठ्या पेचात पडले आहेत. विरोध करताना विकासकामे नाहीत किंवा इतर काही आरोप केले जातात, परंतु आता सरकारनेच पुरस्कारने गौरवल्यानन्तर मात्र विरोधक देखील मोठ्या संभ्रमात पडल्याचं बोललं जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe