Tata Curvv EV vs Mahindra BE 6 : भारतातील इलेक्ट्रिक व्हेईकल मार्केट सातत्याने ग्रो करत आहे. खरे तर सध्या इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा कंपनीचा मोठा बोलबाला आहे. त्या पाठोपाठ आता महिंद्राने देखील इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये चांगली मजल मारली आहे. कंपनीने अलीकडेच बहूप्रतीक्षीत आणि बहुचर्चित अशा दोन इलेक्ट्रिक व्हेईकल बाजारात उतरवल्या आहेत.
फक्त टाटा आणि महिंद्राच नाही तर इतरही ऑटो कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंट वर लक्ष ठेवून आहेत अन नवनवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स वर सध्या कंपन्या काम करत आहेत. यामुळे प्रमुख ब्रँड्समध्ये इलेक्ट्रिक सेगमेंटसाठी आता मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढताना दिसत आहे. याच स्पर्धेमुळे काहीतरी वेगळेपण म्हणून आता काही नामांकित कंपन्यांनी नवीन बॉडी टाईपच्या इलेक्ट्रिक एसयूव्ही बाजारात उतरवल्या आहेत.
म्हणूनच, टाटा मोटर्स आणि महिंद्रासारख्या भारतीय ऑटोमोबाईल दिग्गजांनी Tata Curvv अन BE6 या कुपे Suv बाजारात लॉन्च केल्या आहेत. या दोन्ही एसयुव्ही चा बॉडी टाईप सेम आहे मात्र यामधील फीचर्स, स्पेसिफिकेशन, प्राईज अशा साऱ्या गोष्टी भिन्न आहेत. यामुळे आज आपण या दोन्ही गाड्यांची तुलना करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
दोघांचे डायमेन्शन कसे आहे?
टाटा कर्व्ह ईव्ही टाटा मोटर्सच्या सिग्नेचर डिझाइनचे अनुसरण करते, या गाडीच्या डायमेन्शन बाबत बोलायचं झालं तर गाडीची लांबी 4,210 मिमी, रुंदी 1,810 मिमी आणि उंची 1,637 मिमी आहे. यात 2,560 मिमीची व्हीलबेस आणि 186 मिमीची ग्राउंड क्लीयरन्स आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची अलीकडेच लॉन्च झालेली बीई 6 ची लांबी 4,371 मिमी, रुंदी 1,907 मिमी आणि उंची 1,627 मिमी इतकी आहे.
म्हणजे महिंद्राची कार किंचित मोठी आहे. यात 2,775 मिमीचा व्हीलबेस आणि 207 मिमीची ग्राउंड क्लीयरन्स आहे. ग्राउंड क्लिअरन्स देखील महिंद्राचाच अधिक आहे. यामुळे ऑफ रोडींग मध्ये देखील ही गाडी फायद्याची ठरू शकते, विशेषतः ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी हा एक बेस्ट पर्याय राहणार आहे. डायमेन्शन महिंद्राच्या गाडीचे अधिक आहे पण बूट स्पेस हा टाटाच्या गाडीचा अधिक आहे. तथापि महिंद्राच्या गाडीला फ्रंक स्टोरेज अधिक देण्यात आले आहे.
दोघांचे पावर ट्रेन कसे आहे?
टाटा कर्व्ह ईव्ही त्याच्या विद्यमान आयसीई प्लॅटफॉर्मच्या सुधारित आवृत्तीद्वारे हाऊस बॅटरी आणि इलेक्ट्रिक मोटर्समध्ये बदल करण्यात आला आहे. म्हणूनच, त्यास फ्रंट व्हील ड्राइव्ह सेटअप मिळतो. हे अनुक्रमे 45 केडब्ल्यूएच आणि 55 केडब्ल्यूएचच्या दोन बॅटरी पॅक पर्यायांद्वारे समर्थित आहे जे अनुक्रमे 430 किमी आणि 502 किमी पर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम असल्याचा दावा केला जातोय.
दुसरीकडे, महिंद्रा बीई 6 ब्रँडच्या इलेक्ट्रिक वाहनांना आधार देण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या स्केटबोर्ड आर्किटेक्चरवर आधारित आहे. म्हणून या गाडीत रियर-व्हील-ड्राईव्ह सेटअप ऑफर करत आहे. हे तुलनेने मोठे 59 केडब्ल्यूएच आणि 79 केडब्ल्यूएच बॅटरी पॅकद्वारे समर्थित आहे जे एकाच चार्जवर 535 किमी आणि 682 किमी पर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
दोघांच्या स्पेसिफिकेशन कशा आहेत ?
BE 6 च्या तुलनेत Tata Curvv EV पॉवर आउटपुटमध्ये मागे आहे.
पॉवर – Tata Curvv EV 150 hp ते 167 hp पर्यंत (वेरिएंटनुसार) पावर जनरेट करू शकते. BE 6e 231 hp ते 286 Hp पॉवर जनरेट करू शकते.
टॉर्क – Tata Curvv EV 215 Nm पर्यंत टॉर्क जनरेट करते
अन BE 6e 380 Nm टॉर्क जनरेट करते.
किंमती कशा आहेत?
टाटा कर्व्ह ईव्हीच्या किंमती 17.49 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपासून सुरु होतात अन या मॉडेलचे सर्वात महाग व्हेरियंटची किंमत 21.99 लाख (एक्स-शोरूम) इतकी आहे. महिंद्राच्या BE 6e ची किंमत 18.90 लाख रुपये (एक्स-शोरूम) ते 26.90 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहेत.